Monday, May 27, 2024
Homeनगरसमृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! १२ जणांचा जागीच मृत्यू, अनेक गंभीर

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! १२ जणांचा जागीच मृत्यू, अनेक गंभीर

वैजापूर | दीपक बरकसे | प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) मोठा अपघात झाला आहे. अपघातात बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये काही लहान बालकांचा देखील समावेश आहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्याजवळ एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दहा ते बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धक्कादायक म्हणजे अपघातात मृत व्यक्तींमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. हे सर्व भाविक नाशिकमधील असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या