Saturday, September 21, 2024
Homeनगरसमृद्धी महामार्गावर 4 हजार किलो गोमांस पकडले

समृद्धी महामार्गावर 4 हजार किलो गोमांस पकडले

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

संगमनेर (Sangamner) येथून छत्रपती संभाजीनगरला (Chhatrapati Sambhajinagar) जाणारे 4 हजार किलो गोमांस कोपरगाव पोलिसांनी (Kopargav Police) गोरक्षकांच्या मदतीने पकडले. ही कारवाई कोपरगाव येथील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ करण्यात आली. टेम्पोसह नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सोमवारी पहाटे चारच्या सुमारास गोमांसने (Beef) भरलेला ट्रक समृद्धी महामर्गावर (Samruddhi Highway) येत असल्याची गुप्त माहिती पोलीस हेड कॉन्स्टेलबल बी. एस. कोरेकर यांना मिळाली होती. कोरेकर यांनी पोलीस उपनिरीक्षकम रोहिदास ठोंबरे, पो. हे. कॉ. जाधव यांना फोन करुन बोलावुन घेतले. पहाटे सव्वा चार वाजता समृध्दी महामार्गाच्या (Samruddhi Highway) कोपरगाव टोलनाक्यावर आयशर टेम्पो (एमएच 17 बीवाय 0489) थांबविण्यात आला. चालकाला विचारपूस केली असता त्याने उडवाडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर पोलीस व बजरंग दलाचे कार्यकर्ते शिवम अमृतकर, आकाश देवकर, किरण सुर्यवंशी यांनी टेम्पोची तपासणी केली तेव्हा गोवंश जातीच्या जनावरांचे मांस भरलेले दिसून आले.

त्यानंतर चालक जाकिरखान नसिरखान पठाण (वय 49, रा. देविगल्ली, मोगलपुरा संगमनेर) व फारुक कासम शेख (वय 59, रा. सेवकनगर, के.ए. रोड, जरी मारी कुर्ला वेस्ट, मुंबई, हल्ली राहणार जमजम कॉलनी संगमनेर) यांना ताब्यात घेण्यात आले. चार लाख रूपयांचे चार हजार किलो गोमांस व पाच लाख रूपये किमतीचा टेम्पो असा एकूण 9 लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त (Police Seized) केला. पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. दहे यांनी मांसाचे नमुणे तपासणी करीता राखून ठेवले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाळु भाऊराव घोंगडे यांच्या फिर्यादीवरून वरील दोघांविरूद्ध महाराष्ट्र गो संरक्षण अधिनियमाचे कलम 5 (क), 9, 11 व भा. न्या. सं. 223, 281, 273, 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या