Tuesday, March 25, 2025
Homeनगरसावळीविहिर, धोत्रेसह महाराष्ट्रात 16 नव्या स्मार्ट सिटी उभारणार?

सावळीविहिर, धोत्रेसह महाराष्ट्रात 16 नव्या स्मार्ट सिटी उभारणार?

प्रकल्पाशी संबंधित आज उच्चस्तरीय बैठक

मुंबई | Mumbai

नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग आहे. 700 किलोमीपेक्षा मोठा असा हा महामार्ग 700 किलोमीपेक्षा मोठा आहे. मुंबई ते नागपूरला असा हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना जोडणारा असून 390 गावांमधून जात आहे. समृद्धी महामार्ग हा भविष्यात मोठा गेम चेंजर ठरणार आहे. समृद्धी महामार्गालगत अहिल्यानगर जिल्ह्यातील सावळीविहिर, धोत्रेसह महाराष्ट्रात 16 ठिकाणी स्मार्ट सिटी उभारल्या जाणार आहे. याबाबत महायुती सरकारचा मास्टरप्लॅन रेडी आहे.

- Advertisement -

या मार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवास फक्त 6 तासांत पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गील नागपूर ते शिर्डी या 520 किमी लांबीच्या पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला झाला. यानंतर शिर्डी ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर इंटरचेंजपर्यंत एकूण 80 किमी लांबीचा टप्पा देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. एकूण 701 किमी पैकी 625 किमी लांबीचा मार्गावरुन वाहतूक सुरु झाली आहे. इगतपुरी ते आमणे मार्ग हा 76 किमी लांबीचा टप्पा हा समृद्धी महामार्गील शेवटचा टप्पा आहे. या टप्पा सुरु झाल्यावर मुंबई ते नागपूर सहा तासांचा सुपरफास्ट प्रवास होणार आहे.

समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास पूर्णत्वास आले आहे. येत्या काही दिवसांत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा ही कार्यान्वित होणार आहे. समृद्धी महामार्गावर 16 ठिकाणी स्मार्ट सिटी तयार करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. समृद्धी महामार्गालगतचा स्मार्ट सिटी प्रकल्प लवकरच पूर्णत्वात येण्याचा महायुती सरकारचा संकल्प आहे. 30 डिसेंबर रोजी या प्रकल्पाशी संबंधित उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली आहे. समृद्धी महामार्गामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. स्मार्ट सिटी असलेल्या परिसरातील शेतकर्‍यांना आपला शेतमाल निर्यात करायसाठी जेएनपीटी, वाढवन अशा बंदरांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आसपासच्या लघुउद्योगांना चालना मिळेल.आयात-निर्यातीचे प्रमाण वाढल्याने स्थानिकांना याचा फायदा होणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत समृद्धी महामार्गालगत 16 ठिकाणी स्मार्ट सिटीची निर्मिती केली जाणार आहे.

1- विरुल (चेनेज – 80 ) वर्धा.
2 – दत्तपूर (चेनेज – 105.7) अमरावती.
3 – शिवनी (चेनेज – 137.5) अमरावती.
4 – शेह (चेनेज – 182.5 ) कारंजा वाशिम.
5 – वानोज (चेनेज – 210.5 ) वाशिम.
6 – रिधोरा (चेनेज – 239.6 ) वाशिम.
7 – साब्रा (चेनेज – 283.3) मेहकर बुलढाणा
8 – माळ सावरगाव (चेनेज – 340) बुलढाणा
9 – जामवाडी (चेनेज – 365) जालना.
10 – हडस पिंपळगाव (चेनेज -470)
11 – जांबरगाव (चेनेज – 488.5) संभाजीनगर.
12 – धोत्रे (चेनेज 505) कोपरगाव, अहिल्यानगर.
13 – सावळी विहीर (चेनेज – 520) अहिल्यानगर.
14 – फुगाले (चेनेज – 635) ठाणे.
15 – सपगाव (चेनेज – 670 ) ठाणे.
16- लेणाड (चेनेज – 673) ठाणे.

1 कोणते फायदे होणार ?
कृषी संबंधित उद्योग व्यवसाय निर्माण होऊन शेतकर्‍यांना याचा फायदा होईल.स्मार्ट सिटी असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर युवकांना रोजगार मिळेल. कृषी, वाणिज्य, निर्यात आयात व्यवसायाचे संबंधित उद्योग या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे शेतकर्‍यांना फायदा होईल. परिसरातील असलेले निगडित लघुउद्योगांना चालना मिळेल. स्मार्ट सिटी असलेल्या परिसरातील शेतकर्‍यांना आपला शेतमाल निर्यात करायसाठी जेएनपीटी, वाढवन अशा बंदरांना कनेक्टिव्हिटी मिळेल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...