वैजापूर । तालुका प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. हैद्राबादहून शिर्डी व नाशिक येथील प्रवासी घेऊन भरधाव वेगात निघालेल्या ट्रॅव्हल्सने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली.
या घटनेत ट्रॅव्हल्समधील २४ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर परिसरात आज (बुधवार) सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरालगत समृध्दी महामार्गावर खांबाळा शिवारात चॅनेल क्रमांक ४९६.८ ते ४९६.९ दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्स मधील २४ जण जखमी झाले आहे. जखमींना महामार्ग पोलिस व महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांनी रुग्णवाहिकेची मदतीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
हे ही वाचा : किरकोळ कारणावरून सोनईत दगडफेक
घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे,उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.अपघातातील गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी घाटीत हलवण्यात आले आहे.
अपघातातील जखमी
सादिक शेख असलम शेख (वय 33 वर्षे राहणार गंगापूर)
संतोष कुमार (वय 45 वर्षे राहणार हैद्राबाद)
नंदिनी संतोष कुमार (वय 37 वर्षे राहणार हैद्राबाद)
वसंत मले (वय 38 राहणार जहिराबाद तेलंगणा)
लावण्या सुभाष (वय 30 राहणार हैद्राबाद)
सुभाष कसराम (वय 36 राहणार हैद्राबाद)
दिनेश सिहेज (वय 25 राहणार हैद्राबाद)
हरीश संतोष कुमार (वय 15 राहणार हैद्राबाद)
हरीश संतोष कुमार (वय 15 राहणार हैद्राबाद)
स्वतिश्री महांती (रा. उडीसा)
संजीव मोहन कुमार (वय 43 राहणार उडिसा)
सलोना दास संजीव कुमार (वय 36 राहणार उडीसा)
कृष्णा भिक्षम (वय 46 राहणार तेलंगणा)
करून वसंत मले (वय 31 राहणार जाहीराबाद)
गोपीनाथ रेडी (राहणार हैद्राबाद)
सचिन यादव (वय 27 राहणार यवतमाळ)
सिद्धार्थ भास्कर पवार (वय 45 राहणार नाशिक)
चींनी श्रीधर (राहणार हैद्राबाद)
कृष्णा कनम (वय 46 राहणार हैद्राबाद)
सलीम राजू (वय 25 वर्षे)
रूही कांबळे (वय 21 राहणार लातूर)
हरीश आदित्य संतोष कुमार (वय 15 राहणार हैद्राबाद)
वेदांत रीही मन्ने (वय 8 राहणार हैद्राबाद)
तनही मन्ने (वय 10 राहणार हैद्राबाद)
जोखिता कुमार (वय 13 वर्षे राहणार हैद्राबाद).
हे ही वाचा : भाजपला मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांचा पराभव
दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार रमेश बोरनारे व पंकज ठोंबरे यांनीही अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.