Friday, November 22, 2024
Homeनगरवाळू उत्खनन प्रकरणी शेतकर्‍याच्या सातबारावर चढवला 47 लाखांचा बोजा

वाळू उत्खनन प्रकरणी शेतकर्‍याच्या सातबारावर चढवला 47 लाखांचा बोजा

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील बहिरवाडी येथील गट नं. 39 मधील क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे अंदाजे 118 ब्रास वाळूचे उत्खनन केल्याप्रकरणी नेवासा तहसीलदारांनी दत्तात्रय घमाजी गवळी यांना 47 लाख 32 हजार 300 रुपये दंडाची नोटीस बजावली होती, मात्र सदर दंडाची रक्कम न भरल्याने दत्तात्रय घमाजी गवळी यांच्या सात-बारा उतार्‍यावर 47 लाख 32 हजार 300 रुपये बोजा चढविण्यात आला आहे.

- Advertisement -

माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके यांनी याबाबत तक्रार अर्ज केला होता. त्याअनुषंगाने मंडलाधिकारी यांनी पाहणी केली असता अनधिकृतपणे अंदाजे 118 ब्रास उत्खनन केले असल्याबाबत पंचनामा व अहवाल तहसीलदार यांना सादर केला होता. त्यावरून दत्तात्रय घमाजी गवळी यांना 47 लाख 32 हजार 300 रुपये दंडाची नोटीस बजावली होती. श्री.गवळी यांनी सादर केलेला खुलासा मान्य नसल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) अन्वये एकूण रक्कम रुपये 47 लाख 32 हजार 300 दंड रकमेचा बोजा श्री.गवळी यांच्या सातबारा उतार्‍यावर चढवून त्यांची दिनांकित स्वाक्षरीची प्रत तहसील कार्यालयास तात्काळ सादर करावी, असे आदेश तहसीलदारांनी बहिरवाडीच्या कामगार तलाठ्यांना दिले होते. त्यानुसार दत्तात्रय घमाजी गवळी यांच्या हिस्स्याच्या क्षेत्रावर फेर नंबर 2027 नुसार 47 लाख 32 हजार 300 रकमेचा बोजा चढविण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या