Friday, January 23, 2026
Homeक्राईमवाळूतस्करांवर ‘एलसीबी’ची कारवाई; 5 लाख 6 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाळूतस्करांवर ‘एलसीबी’ची कारवाई; 5 लाख 6 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथे वाळू माफियांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. 25) कारवाई करत वाहन व वाळू असा एकूण 5 लाख 6 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करुन वाहतूक करणार्‍या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार संतोष खैरे, गणेश लोंढे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव यांचे पथक तयार करुन अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करुन वाहतूक करणार्‍या इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत सूचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.

- Advertisement -

हे पथक मंगळवारी घारगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करुन वाहतूक करणार्‍या इसमांची माहिती काढत असताना पथकास शिंदोडी ते मांडवे रस्त्यापासून तरंगेवस्तीकडे जाणारे रस्त्यावर एक टेम्पो हा संशयितरित्या मिळून आला. सदर टेम्पोची पाहणी केली असता त्यात वाळू भरलेली आणि दोघे बसलेले दिसून आले. पथकाने त्यांना ताब्यात घेवून नाव विचारले असता राहुल किशोर खेमनर (वय 21) व रवीन्द्र संजय मोरे (वय 23, रा. मांडवे बुद्रुक) असे सांगितले आहे. 6 हजार रुपये किमतीची 1 ब्रास वाळू व 5 लाख 400 रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 5 लाख 6 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पो.कॉ. अमृत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी वरील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

संपादकीय : २३ जानेवारी २०२६ – मार्ग मोकळा तर झाला..

0
राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले. एकप्रकारे सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. गेली आठ वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे...