Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रवाळू स्वस्तात मिळणार!

वाळू स्वस्तात मिळणार!

मुंबई (प्रतिनिधी)

जनतेला माफक दरात वाळू मिळावी यासाठी वाळू, रेती उत्खननाबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

PHOTO : अल्लू अर्जुनची रियल लाईफ ‘श्रीवल्ली’ पाहिलीत का?

राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू, रेती उत्खननाबाबतचे आता असलेले धोरण रद्द करून, जनतेस माफक दरात वाळू मिळावी यादृष्टीने वाळू, रेती उत्खननाबाबत सर्वकष असे सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सोनाली कुलकर्णीचा मकरसंक्रातीनिमित्तचा लूक पाहिलात का…

बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्यात नदी पात्रातील व खाडी पात्रातील वाळू, रेती निष्कासनासाठी शासन निर्णय दि. ३. सप्टेंबर २०१९ व दि. २१ मे २०१५ अशा या दोन शासन निर्णयांद्वारे धोरण निश्चित करण्यात आले होते. हे धोरण रद्द करण्यात आले आहे.

‘या’ ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

जनतेस माफक दरात वाळू मिळावी म्हणून स्वामित्वधनाच्या हातची किंमत (रॉयल्टी) दराने करण्यास, वाळू उत्खननाचा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढविण्यास आणि यशस्वी लिलावधारकास हेतूपत्र मिळाल्यानंतर पर्यावरण अनुमती प्राप्त करून घेण्यास त्याचप्रमाणे खाडीपात्रात हातपाटीने वाळू काढण्याच्या पारंपारिक व्यवसायाकरिता स्वामित्वधनाच्या दराने परवाने देण्याचा समावेश करून हे एकत्रित सुधारित धोरण तयार करण्यात आले आहे.

Dhanush and Aishwaryaa : धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट, का घेतला निर्णय?सोशल मीडियावर ‘प्रियांका चोप्रा’च्या भन्नाट लुकची चर्चा, पाहा PHOTOS

- Advertisment -

ताज्या बातम्या