बेंगळुरू l Bengaluru
एकीकडे रिया चक्रवर्ती ड्रग्ज प्रकरण समोर आले आहे त्यातच Sandalwood Drug प्रकरणी बेंगळुरू पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे विभागाने (सीसीबी) मंगळवारी संजना गलरानी(Sanjjanaa Galrani) या कन्नड अभिनेत्रीला अटक केली आहे.
या प्रकरणात अगोदर रागिणी द्विवेदी हिलाही अटक करण्यात आली आहे. संजनाला पोलिसांनी इंदिरानगर परिसरातील घरातून ताब्यात घेतले आहे. आधीच अटकेत असलेला वीरेन खन्ना याच्या घरावर पोलिसांनी छापाही मारला. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण १३ जणांना आरोपी बनवण्यात आले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
कन्नड सिने इंडस्ट्रीत होत असलेल्या ड्रग्जच्या वापराची चौकशी मध्यवर्ती गुन्हे विभागाकडून सुरू आहे. याच प्रकरणात चौकशीनंतर मंगळवारी संजना गलरानी हिला अटक करण्यात आली. यापूर्वी शहरात हाय-प्रोफाईल पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवण्यासाठी अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिला शहर पोलिसांनी अटक केली होती. यानंतर मंगळवारी मध्यवर्ती गुन्हे विभागानं गलरानीच्या इंदिरा नगर परिसरातील घरावर छापा टाकला त्यानंतर तिला अटक करण्यात आलीय. यानंतर संजनाला मध्यवर्ती गुन्हे विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं. संजना हिचा जन्म बेंगळुरूमध्येच झालाय. तिनं २००६ मध्ये तामिळ सिनेमा ‘ओरू कढाल सीवीर’ सिनेमातून पदार्पण केलं होतं. तसंच कन्नड सिनेमा ‘गंदा हेंदाती’मध्येही तिनं काम केलंय.