मुंबई | Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला आले असताना हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांना अज्ञात आरोपींनी स्टम्पच्या साहाय्याने मारहाण केली. या हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर त्यांना आरामासाठी घरी सोडण्यात आलं.
या हल्ल्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. मुंबई पोलिसांनीही घटनेची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. दरम्यान, याच प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी मुंबई पोलिसांकडे एक मागणी केली आहे. ज्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्यामागे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा हात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
Viral Video : तुफान राडा! एकाच बॉयफ्रेंडसाठी २ तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्…
त्यामुळे मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी अमेय खोपकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी केल्यानंतर त्यामध्ये जर काही तथ्य निघालं तर त्यांना अटक करण्यात यावी, असेही खोपकर यांनी म्हटले. या मागणीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
सुप्यात कोयता गँगची दहशत; एकावर कोयत्याचे वार
नेमकं काय घडलं?
संदीप देशपांडे हे शुक्रवारी (3 फेब्रुवारी) सकाळी मुंबई येथील दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे फेरफटका मारत होते. मॉर्निग वॉक करत असलेल्या संदीप देशपांडे यांना एकटे गाठून चेहेरे झाकलेले चार लोक तिथे आले. या चौघांनी क्रिकेट स्टंपने संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केला. ज्यात संदीप देशपांडे यांच्या हातापायांना दुखापत झाली. राजकीय पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असवा अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने गर्लफ्रेंडशी केला साखरपुडा; कधीकाळी विराट कोहलीला केलं होतं प्रपोज
संदीप देशपांडे हे एक कट्टर मनसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले.