Monday, June 24, 2024
HomeनाशिकNashik Teacher Constituency Election 2024 : मविप्र संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे ठाकरेंच्या...

Nashik Teacher Constituency Election 2024 : मविप्र संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर?

नाशिक | Nashik

- Advertisement -

शिक्षक मतदारसंघ निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. विद्यमान आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांच्या समोर कॉंग्रेसचे नेते आणि जिल्ह्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांनी देखील निवडणुक लढण्याची तयारी करुन दंड थोपटले आहेत. या पार्श्वभूमीवर गुळवे यांचा आज ठाकरेंच्या शिवसेनेत (Thackeray Shivsena) प्रवेश होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

हे देखील वाचा : Vidhan Parishad Election 2024 : नाशिक शिक्षक मतदार संघासाठी तीन अर्ज दाखल

अ‍ॅड. संदीप गुळवे हे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असून त्यादृष्टीने त्यांनी भेटीगाठी व चर्चा सुरू केल्याचे चित्र आहे. नाशिकची जागा महाविॅकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सुटलेली असल्याने अ‍ॅड. गुळवे हे आज शिवसेना कार्यालयाला (Shivsena Office) भेट देऊन शिवसेना पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच अ‍ॅड. संदीप गुळवे यांनी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार केलेला आहे. त्यामुळे उमेदवारीबाबतचा तिढा सोडवण्यासाठी आज गुळवे शिवसेना पदाधिकार्‍यांसमवेत चर्चा करणार आहेत. त्यानंतरच अ‍ॅड. संदीप गुळवे यांचा शिवसेनेत प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या