Friday, May 3, 2024
Homeनगरसंगमनेरात पोलिसांनी केला गुटखा जप्त

संगमनेरात पोलिसांनी केला गुटखा जप्त

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्यात गुटखा बंदी (Gutakha Ban) असतांना गुटख्याची संगमनेरात (Sangamner) सर्रास विक्री करणार्‍या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) झाला आहे. त्याच्याकडून 5 हजार 400 रुपयांचा गुटखा व मोटारसायकल जप्त (Motorcycle Seized) करण्यात आली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची दुटप्पी भूमिका

दिलीप सहादू शिंदे (रा. गुंजाळवाडी) हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (Motorcycle Seized) क्रमांक एम एच. 15 जी 9567 हिच्याहून गुटखा विक्री (Gutkha) करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दिलीप शिंदे यास देवाचा मळा येथे पकडले. त्याच्याकडून 4320 रुपयांचा हिरापान मसालाची 36 पाकिटे व पिवळ्या रंगाचे रॉयल कंपनीचे सुगंधीत तंबाखू 1080 रुपयांची व मोटारसायकल 20 हजार रुपयांची असा एकूण 20 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे.

थकबाकीचा 4 था हफ्ता जूनच्या पगारासोबत..!

पोलीस कॉन्स्टेबल अविनाश बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिलीप शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबरस 407/2023 भारतीय दंड संहिता 188, 272, 273, 328, अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 नियमाचे कलम 59, 26 (2),(खत) प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.

शिर्डीत रविवारी ना. आठवले यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयचे अधिवेशन

- Advertisment -

ताज्या बातम्या