संगमनेर (तालुका प्रतिनिधी)
कोल्हार-घोटी रस्त्यावर कोकणगावजवळ रविवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि मदत व बचाव कार्य सुरु केले.
जखमींना तत्काळ संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली जात आहे.
या अपघातामुळे कोल्हार-घोटी मार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस तपास सुरु असून अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी अधिक तपशील गोळा करण्यात येत आहे.




