Tuesday, January 6, 2026
Homeनगरकत्तलखान्यांवर LCBची धडक कारवाई; चार आरोपींकडून ११ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा...

कत्तलखान्यांवर LCBची धडक कारवाई; चार आरोपींकडून ११ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

संगमनेर (प्रतिनिधी)

शहरातील अवैध गोवंश वारंवार कत्तलखान्यांवर कारवाया करुनही ते बंद होत नसल्याचे पुन्हा एकदा अधोरे-खीत झाले आहे. मदिनानगर येथे शुक्रवारी (दि.२६) पहाटेच्या सुमारास अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन चार आरोपींकडून ११ लाख ४५ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन १६ गोवंशीय जनावरांची कत्तलीपासून सुटका केली आहे.

- Advertisement -

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची व गोमांस विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पो लीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पो-लीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष खैरे, अमृत आढाव, अमोल आजबे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले.

YouTube video player

हे पथक शुक्रवारी पहाटेच्या सुमारास संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत कासिफ असद कुरेशी (रा. गल्ली नं. ०२, मदिनानगर) हा एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली, पथकाने तत्काळ तेथे छापा टाकला असता तिघेजण गोवंशीय जनावरांची कत्तल करत असताना दिसून आले. त्यावेळी एकजण पोलिसांना पाहून पळून गेला तर उर्वरीत गुलाम फरीद जावेद कुरेशी (वय ३०, रा. मोगलपुरा, पुणे रस्ता, संगमनेर) व मोहंमद वसीम मुबारक अली (वय ३२, रा. शंकरपूर, बाहरिच, उत्तर प्रदेश, हल्ली रा. मदिनानगर, संगमनेर) या दोघांना पकडले. त्यांच्याकडे पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता कासिफ असद कुरेशी (रा. कादी मस्जिद, पुणे रस्ता, संगमनेर) असे नाव असल्याचे सांगितले. सदर ठिकाणावरुन ९ लाख ३० हजार रुपये किमतीचे ३११० किलो गोमांस, ७०० रुपये किमतीची एक कुन्हाड व सुरी असा एकूण ९ लाख ३० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

तर दूसरी कारवाई कोल्हेवाडी रस्ता परिसरात केली. गोपनीय माहितीवरुन कोल्हेवाडी रस्ता हाजीनगरच्या मोना प्लॉटमधील काटवनामध्ये जावून खात्री केली असता २ लाख १५ हजार रुपये किमतीची एकूण १६ लहान-मोठी जिवंत गोवंशीय जना वरे विना चाऱ्यापाण्याचे व निर्दयतेने बांधलेल्या स्थितीत मिळून आल्याने त्यांची सुटका करण्यात आली.

सदर जनावरांबाबत विच- ारपूस केली असता मुद्दस्सर हाजी कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर (फरार)) याने कत्तल करण्याच्या उद्देशाने सदर ठिकाणी आणून बांधलेली असल्याची माहिती मिळाली. वरील दोन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये एकूण ११ लाख ७५ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन १६ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे. सर्व आरोर्पीविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...