Tuesday, March 25, 2025
Homeनगरसंगमनेर तालुक्यात आता चोरांऐवजी बिबट्यांची दहशत

संगमनेर तालुक्यात आता चोरांऐवजी बिबट्यांची दहशत

नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये भीती || वन विभागाने उपाययोजना करण्याची गरज

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे नरभक्षक बिबट्याने दीडवर्षीय चिमुकलीवर हल्ला करुन ठार केल्यानंतर तेथील नागरिक भयभीत झालेले आहे. अशातच चंदनापुरी, झोळे, निमगाव टेंभी, खांडगाव, शिरापूर, समनापूर, सुकेवाडी, धांदरफळ आदी गावांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार होत असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे वन विभागाने तत्काळ उपाययोजना करुन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

- Advertisement -

तीन दिवसांपूर्वी हिवरगाव पावसा येथे दीडवर्षीय ओवी सचिन गडाख या चिमुकलीवर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला करत ठार केले. त्यामुळे तेथील ग्रामस्थ भयभीत झालेले आहे. या परिस्थितीत नागरिक सतर्क झाले असले तरी बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या दिवशी चंदनापुरी येथील योगेश फरगडे यांच्या वस्तीवर मांजरीची शिकार करण्यासाठी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्याने पाठलाग केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याचबरोबर दुसर्‍या दिवशी रात्रीच्या वेळी झोळे येथे गावातून दुचाकीवरुन घरी जाणार्‍या तरुणावर बिबट्याने पंजा मारुन जखमी केल्याची घटना घडली आहे. हा हल्ल्यांचा सिलसिला कायम असल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

या घटनांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे. कारण, सध्या गिन्नी गवत, ऊस, डाळिंब, मका आदी उभी पिके असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळत आहे. तेथे दबा धरुन अचानक हल्ला करत आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्या वेळी देखील चोरांपेक्षा बिबट्यांची दहशत वाढल्याचे वास्तव चित्र पाहायला मिळत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. मंगळवारी बाजार समितीत 2522 कांदा (Onion) गोण्यांची आवक झाली....