Tuesday, March 25, 2025
Homeनगरखळबळजनक! लग्नाच्या काही महिन्यानंतर नवदाम्पत्यानं संपवलं आयुष्य, झाडाला घेतला गळफास

खळबळजनक! लग्नाच्या काही महिन्यानंतर नवदाम्पत्यानं संपवलं आयुष्य, झाडाला घेतला गळफास

संगमनेर । प्रतिनिधी

काही महिन्यापूर्वी लग्न (marriage) झालेल्या नवदाम्पत्यानं आपलं आयुष्य संपवल्यानं (couple suicide) मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना संगमनेर (Sangamner) तालुक्यातील साकूर येथे घडली.

- Advertisement -

वैभव आमले (वय २२) आणि स्नेहा आमले (वय २०) अशी या नवदाम्पत्याची नावं आहेत. सुखी संसाराची स्वप्न रंगवण्याच्या काळात नवदाम्पत्याने इतका टोकाचा निर्णय का घेतला असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

हे ही वाचा : सोनेवाडी परिसरात बिबट्याची दहशत… मोटर सायकलस्वार थोडक्यात बचावला

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव व स्नेहा आमले यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. हे दोघेही पुण्यात नोकरी करत होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच दोघेही संगमनेरमधील त्यांचे मूळ गाव असलेले साकोरे येथे परत आले होते. रविवारी संध्याकाळी या दोघांनी एका झाडाला दोर बांधून एकत्रच गळफास घेतला.

हे ही वाचा : “राज ठाकरे यांनी दोन-तीनदा माझे नाव का घेतलं” ; शरद पवारांचा खोचक सवाल

झाडाला लटकणारे या दोघांचे मृतदेह गावकऱ्यांच्या नजरेस पडल्यानंतर पोलिसांना याठिकाणी बोलवण्यात आले. त्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा केला असून सदर घटना कशामुळे घडली हे मात्र समजू शकले नाही.नवदाम्पत्यानं आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. यानंतर शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

या नवदाम्पत्याने आत्महत्या केली की अन्य काही प्रकार आहे? आत्महत्या केली असेल तर त्यामागील नेमकं काय कारण असेल? याबाबत अधिक तपास घारगाव पोलीस करीत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

हे ही वाचा : Hindenburg Report च्या नव्या रिपोर्टनंतर अदानींच्या शेअर्सला मोठा फटका!

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...