Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशHindenburg Report च्या नव्या रिपोर्टनंतर अदानींच्या शेअर्सला मोठा फटका!

Hindenburg Report च्या नव्या रिपोर्टनंतर अदानींच्या शेअर्सला मोठा फटका!

मुंबई । Mumbai

- Advertisement -

हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या वर्षी अदाणी समूहावर गंभीर आरोप केले होते. हिंडेनबर्गने अहवालाद्वारे केलेल्या आरोपांचा परिणाम त्यानंतर अदाणी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवर झाला होता.

यानंतर आता हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा भारतात काहीतरी घडणार असल्याचा दावा करत शनिवारी (दि.१०) आपला नवीन अहवाल सादर केला. यामध्ये सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती या दोघांचे गौतम अदानी यांच्यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपाचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर आज दिसून आला आहे.

आठवड्याच्या पहिल्या दिवशीच शेअर बाजारातील काही शेअर्स धडाधडल कोसळले. अदानी ग्रुपमधील अनेक कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याचे दिसून आले. अदानी विल्मर, अदानी एनर्जी सॉल्यूशनसहित इतर अनेक शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे

हे ही वाचा : Hindenburg Report च्या आरोपांवर सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच काय म्हणाल्या?

अदानी विल्मरचे शेअर ६ टक्क्यांनी घसरला आहे. तर अदानी ग्रुपचा बेंचमार्क अदानी एंटरप्राइजेजमध्येही ३.१७ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली आहे. अदानी टोटल गॅस ७ टक्क्यांनी घसरला आहे. एसीसीमध्ये १.८३ टक्के आणि अंबुजा सिमेंटचा शेअर्स १.५४ टक्क्यांनी घसरला. तर अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर ३.६१ टक्क्यांनी कोसळला.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळी ९.३० वाजताच्या व्यवहारात सेन्सेक्स २२९ अंकानी घसरल्याने ७९४७६ वर पोहोचला. निफ्टी देखील ९१ अंकानी घसरून २४,२७६ वर पोहोचला. निफ्टी टॉप लुजरमध्ये अदानी एंटरप्राइजेजचे शेअर्स २.६५ टक्क्यांनी घसरून ३१०२.९५ रुपयवांवर होता. एनटीपीचा शेअर्सही १.९२ टक्क्यांनी घसरला. तर अदानी पोर्ट्सचा शेअर्स १.८१ टक्क्यांनी घसरून १५०६ रुपयांवर आला.

हे ही वाचा : हाथरसची पुनरावृत्ती! सिद्धनाथ मंदिरात चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या