संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहरातील जमजम कॉलनीमधील अवैध गोवंश कत्तलखान्यावर (Illegal Cattle Slaughterhouses) अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Team) कारवाई रविवारी (दि.4) कारवाई करत तीन आरोपींकडून 8 लाख 70 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणार्या ठिकाणांची व गोमांस विक्री (Beef Sales) करणार्या इसमांची माहिती काढून कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार संतोष खैरे, अमृत आढाव, योगेश कर्डिले, महादेव भांड यांचे पथक तयार करुन संगमनेर (Sangamner) शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणार्या इसमांची माहिती काढून कारवाईसाठी रवाना केले.
सदर पथक रविवारी शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत अब्दुल कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) हा त्याच्या साथीदारासह जमजम कॉलनीतील गल्ली क्रमांक 6 मध्ये पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून त्यांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ त्याठिकाणी जावून छापा (Raid) टाकला असता तिघेजण गोवंशीय जनावरांची कत्तल करत असताना दिसून आले.
पथकाने अब्दुल समद जावेद कुरेशी (वय 27), सकलेन जाकीर कुरेशी (वय 30, दोघेही रा. गल्ली क्रमांक 2, भारतनगर, संगमनेर) व रेहान अल्ताफ शेख (वय 20, रा. दिल्लीनाका, इस्लामपुरा, संगमनेर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 8 लाख 70 हजार रुपये किमतीचे 2900 किलो गोमांस, 800 रुपये किमतीची एक कुर्हाड, कासन व सुरी असा एकूण 8 लाख 70 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या तिघांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.




