Sunday, May 19, 2024
Homeनगरसंगमनेरात भल्या पहाटे कत्तलखान्यांवर छापा

संगमनेरात भल्या पहाटे कत्तलखान्यांवर छापा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर बुधवारी पहाटे 5.30 वाजता छापा टाकला. या कारवाईत 6 लाख 20 हजार रुपये किंमतीचे गोमांस जप्त केले असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील जमजम कॉलनीमध्ये बेकायदेशीर कत्तल खान्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना समजली. त्यानुसार पोलीस पथकाने जमजम कॉलनी परिसरातील नवाज कुरेशी व जब्बार पटेल यांच्या बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा टाकला. पोलिसांनी या कत्तलखान्यातून 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे गोमांस तसेच 50 हजार रुपये किंमतीची हिरव्या रंगाची ओमनी कार व 40 हजार रुपयांचे गोवंश जनावरांचे मांस असा 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच कॉलनीत बेकायदेशीरित्या सुरू असणार्‍या वहीद कुरेशी याच्या कत्तलखान्यावर छापा टाकून 2 हजार किलो सुमारे 4 लाख रुपये किंमतीचे गोमांस जप्त केले.

याप्रकरणी पोलीस नाईक शामराव हासे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नवाज कुरेशी, जब्बार पटेल आणि वाहीद कुरेशी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करत आहेत.

शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह

शहरातील कत्तलखाने बंद करण्यासाठी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. यासाठी कत्तलखाना परिसरात 2 स्वतंत्र पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असतानाही कत्तलखाने सुरूच असल्याने शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या