Tuesday, October 22, 2024
Homeक्राईमसंगमनेर : जमजम कॉलनीतील 3 कत्तलखाने सुरूच?

संगमनेर : जमजम कॉलनीतील 3 कत्तलखाने सुरूच?

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहरातील जमजम कॉलनी परिसरात तीन बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच आहेत. या कत्तलखान्यांमधून विविध वाहनांमधून दररोज हजार किलो गोमांस हैदराबादला निर्यात केले जात असल्याची चर्चा आहे. पोलीस यावर कधी कारवाई करणार, याकडे जनतेचे लक्ष आहे.

- Advertisement -

कोल्हेवाडी रस्ता, जोर्वे रस्ता, जमजम कॉलनी येथे गोवंश जनावरांची कत्तल होते. गेल्या काही दिवसांपासून जमजम कॉलनी परिसरात तीन कत्तलखाने सुरू आहेत. या कत्तलखान्यातून गोमांस दोन मोठ्या वाहनांमधून हैदराबादला पाठविण्यात येते. दोन वेगवेगळ्या वेळांमध्ये या कत्तलखान्यांमध्ये गोवंशाची कत्तल होत असल्याचे समजते. यातील एका कत्तलखान्यामध्ये दुपारी एक ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कत्तल केली जाते.

तर दुसर्‍या कत्तलखान्यामध्ये रात्री साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत कत्तल सुरू असते. शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोहत्या बंदीच्या कायद्याची आठवण करून देत कत्तलखाने बंद करण्यासाठी आंदोलने केली. तरीही कत्तलखाने पूर्णपणे बंद झालेले नाहीत. मध्यंतरी दोन गटांत वाद होवून कत्तलखाने बंद करण्याची जोरदार मागणी झाली होती. परंतु, त्यानंतरही कत्तलखाने सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या