Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमसंगमनेरात एकाला तलवारीने मारहाण; सात जणांवर गुन्हा

संगमनेरात एकाला तलवारीने मारहाण; सात जणांवर गुन्हा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

किरकोळ कारणावरून एका तरुणाला तलवारीने व इतर शस्त्रांनी मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील समनापूर परिसरात घडली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी शहर पोलिसांत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कासिफ असद कुरेशी (वय 24, रा. भारतनगर, संगमनेर) हा मारहाणीमध्ये गंभीर जखमी झाला आहे. त्याने पोलिसांना दवाखान्यामध्ये दिलेल्या जबाबात म्हटले आहे, की मी जिल्ह्यातून 1 वर्षांपासून तडीपार असल्याने नाशिक रोड येथे नातेवाईकांकडे राहतो. बुधवार दि. 21 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मला अब्दुल समद कुरेशी याने तुझ्याशी बोलायचे आहे तू संगमनेर येथे ये असे सांगितले. आपण नाशिक रोड येथून लगेच संगमनेर येथे येण्यासाठी निघालो. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजता संगमनेर येथे पोहोचलो.

- Advertisement -

त्यानंतर काही वेळात मला अब्दुल कुरेशी याचा फोन आला व तो मला म्हणाला आपल्याला एका ठिकाणी जायचे आहे तेव्हा मी घराच्या बाहेर आलो. तेव्हा दोन व्यक्ती मला कारमध्ये बसून आपण बाहेर जावून बोलू असे म्हणून प्लॉटमध्ये घेऊन गेले. तेथे गाडीतून खाली उतरलो तेव्हा साहिल उर्फ साद मुस्ताक कुरेशी, अयाज हबीब कुरेशी, अकीब हरुण कुरेशी, तन्वीर अस्लम पठाण, इस्माईल उर्फ भय्यू नासीर पठाण हे हजर होते. त्यावेळी आमच्यात चर्चा चालू असताना अब्दुल कुरेशी याने नवाज कुरेशी याला फोन केला तेव्हा नवाजने त्याला जिवंत सोडू नका मारुन टाका असे सांगितले. तेव्हा लगेच अब्दुल कुरेशी याने हातातील तलवार डोक्यावर मारली. इस्माईल पठाण व अकीब कुरेशी याने मला पकडून ठेवले आणि पायावर लोखंडी रॉड मारला. तसेच इस्माईलने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने पायावर व पाठीवर मारहाण केली.

बाकी लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात डोक्याला, पायाला व पाठीला मार लागल्याने मी खाली पडलो. त्यानंतर ते निघून गेले. यातील इस्माईल पठाण व अयाज कुरेशी या दोघांनी मला कारमध्ये बसवून कुरण रोडवरील चक्रपाणी स्पेअर पार्ट दुकानासमोर आणून सोडले व त्यांनीच रेहान गुलाब नबी कुरेशी व मकसूर फिरोज कुरेशी यांना फोन करून त्यांच्या ताब्यात दिले. त्या दोघांनी मला माझ्या घरी आणले. यानंतर शहरातील एका रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर मोठ्या रुग्णालयात हलविले. यावरुन शहर पोलिसांनी वरील सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...