Sunday, February 1, 2026
HomeनगरSangamner : पर्यटकांना आकर्षित करणारा आराखडा तयार करा

Sangamner : पर्यटकांना आकर्षित करणारा आराखडा तयार करा

निझर्णेश्वर येथे साकारतोय बिबट सफर प्रकल्प

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील श्री क्षेत्र निझर्णेश्वराच्या अध्यात्मिक स्थळी असलेल्या नैसर्गिक संपन्नतेचा उपयोग करून दुधेश्वर आणि गोरक्षगड येथे पथदर्शी बिबट सफर प्रकल्प निर्माण होत आहे. त्यादृष्टीने पर्यटकांना आकर्षित करणारा निसर्ग पर्यटन आराखडा तयार करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकार्‍यांना दिल्या. संगमनेर तालुक्यातील दुधेश्वर आणि गोरक्षगड येथे असलेल्या निसर्ग संपन्नतेचा उपयोग करून बिबट सफर निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यादृष्टीने वन विभागाने आराखडा तयार करण्यास प्रारंभ केला असून, सुमारे 150 एकर जागेचा उपयोग करून दोन स्वतंत्र बिबट सफर उभारण्याच्या दृष्टीने विचार करण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या आहे.

- Advertisement -

यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी ना. विखे पाटील यांच्या उपस्थितीत वन विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीला वन विभागाचे सहायक वनसंरक्षक अमरजीत पवार, गणेश मिसाळ, वनपरीक्षेत्र अधिकारी सागर केदार, सुभाष सांगळे, सुनील सांळुखे उपस्थित होते. या बैठकीत वन विभागाने बिबट सफारीच्या तयार केलेला प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये नैसर्गिक संपन्नतेला कुठेही धक्का न लावता त्याचे संवर्धन करूनच बिबट सफर प्रकल्पाचे काम झाले पाहिजे. ताडोबा येथील आराखडा नजरेसमोर ठेवून या भागातील प्रकल्प उभा राहावा, अशी अपेक्षा ना. विखे पाटील यांनी बैठकीत व्यक्त केली. बिबट्यांसाठी तयार करण्यात येणारे पिंजरे 25 फूट उंचीचे असून, पर्यटकांना फिरण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा रस्ते, सौर पथदिवे उभारणीचा अंतर्भाव प्रकल्प आराखड्यात करण्याच्या सूचनाही दिल्या. पाण्याची उपलब्धता करून देण्यास जलसंपदा विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल आशी ग्वाही त्यांनी बैठकीत दिली.

YouTube video player

दरम्यान, श्री क्षेत्र निझर्णेश्वर देवस्थानाचे अध्यात्मिक महत्व आहेच. याला जोड निसर्ग पर्यटनाची मिळाल्यास या भागातील रोजगाराला मोठ्या संधी निर्माण होतील असा विश्वास ना. विखे पाटील यांनी व्यक्त केला. अध्यात्मिकस्थळी निर्माण होणारा बिबट सफार प्रकल्प सर्वांसाठी पथदर्शी ठरेल असा निर्माण करायचा असल्याने प्रकल्पासाठी निधी कमी पडणार नाही. कामाला सुरूवात करा, पाहिजे तेवढा निधी देतो. मात्र काम करताना निसर्गाची कुठेही हानी आणि निधीचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांंनी बैठकीत दिल्या.

ताज्या बातम्या

Rahuri : वांबोरीत एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी

0
उंबरे |वार्ताहर| Umbare राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत ज्वेलर्सचे दुकान, जैन मंदिर व एका बंद घरावर डल्ला मारून लाखोंचा...