Monday, May 20, 2024
Homeनगरनिमगाव बुद्रुकच्या वृद्धाचा करोनाने मृत्यू

निमगाव बुद्रुकच्या वृद्धाचा करोनाने मृत्यू

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असून शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत नव्याने 72 करोना रुग्णांची भर पडली आहे.

- Advertisement -

आत्तापर्यंत 2956 करोना बाधित आढळून आले आहेत, तर काल शनिवारी तालुक्यातील निमगाव बुद्रूक येथील एका करोना बाधित 64 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा तालुक्यातील 36 वा करोना बळी ठरला आहे. तर दोन पोलीस पाटील करोना बाधित आढळून आले आहेत, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

तालुक्यातील निमगाव बुद्रुक येथील 64 वर्षीय वृद्धाला करोनाचे संक्रमण आढळून आले. दि. 18 सप्टेंबरपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान काल शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तालुक्यातील हा 36 वा करोना बळी ठरला आहे.

करोनाचे संक्रमण वाढत असल्याने तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांची करोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 2 पोलीस पाटलांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.

शुक्रवारी नव्याने करोना रुग्ण आढळून आले. खासगी लॅब अहवालानुसार स्वातंत्र्य चौक 71 वर्षीय महिला, मोतीनगर 7 वर्षीय बालक, मोतीनगर 33 वर्षीय पुरुष, सांगवी 78 वर्षीय पुरुष, चैतन्यनगर गल्ली क्रमांक 4 मधील 73 वर्षीय पुरुष, गायत्री हाउसींग सोसायटी 18 वर्षीय मुलगा, खंडेरायवाडी गावठाण 58 वर्षीय पुरुष,

इंदिरानगर 25 वर्षीय पुरुष, हंगेवाडी 54 वर्षीय महिला, मालदाड रोड 66 वर्षीय महिला, अ‍ॅन्टीजेन रॅपीड टेस्ट अहवालानुसार हंगेवाडी 26 वर्षीय पुरुष, हंगेवाडी 24 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवती, कौठे बुद्रुक 56 वर्षीय महिला, सावरगाव घुले 38 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 12 वर्षीय बालक, 16 वर्षीय मुलगी, कर्‍हे 19 वर्षीय मुलगा, प्रतापपूर 41 वर्षीय महिला, 41 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, 15 वर्षीय मुलगी, रहिमपूर 37 वर्षीय महिला,

चिंचपूर 62 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 27 वर्षीय महिला, कोकणगाव 63 वर्षीय पुरुष, कोकणगाव 17 वर्षीय मुलगी, 13 वर्षीय मुलगा, कोंची 55 वर्षीय पुरुष, चिंचपूर 20 वर्षीय तरुणी, प्रतापपूर 22 वर्षीय तरुण, देवकौठे 31 वर्षीय महिला, तळेगाव दिघे 60 वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द 39 वर्षीय पुरुष, वडगाव लांडगा 55 वर्षीय पुरुष, जनतानगर 33 वर्षीय पुरुष, घुलेवाडी 28 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, 47 वर्षीय महिला, मालदाड रोड 55 वर्षीय पुरुष, घुलेवाडी 60 वर्षीय महिला,

राजापूर 59 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, घोडेकर मळा 24 वर्षीय तरुण, मालदाड रोड 28 वर्षीय महिला, वडजेमळा 45 वर्षीय महिला, घुलेवाडी 10 वर्षीय बालक, 15 वर्षीय मुलगा, 47 वर्षीय पुरुष, 41 वर्षीय महिला, गुंजाळवाडी 38 वर्षीय महिला, कनकापूर 42 वर्षीय महिला, नांदुरीदुमाला 35 वर्षीय महिला,

वाघापूर 35 वर्षीय पुरुष, मिर्झापूर 48 वर्षीय पुुरुष, 18 वर्षीय मुलगा, जवळेकडलग 10 वर्षीय बालिका, निमगाव भोजापूर 48 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, आंबी दुमाला 38 वर्षीय पुरुष, अकलापूर 54 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, महालवाडी 28 वर्षीय तरुण, मुंजेवाडी 26 वर्षीय तरुण याप्रमाणे अहवाल प्राप्त झाले आहेत.

तालुक्याची करोना बाधितांची संख्या एकूण 2956 झाली आहे. तर आत्तापर्यंत 36 करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. करोनामुक्त झालेले 2631 व्यक्ती तर सध्या 289 सक्रीय रुग्ण आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या