Tuesday, May 7, 2024
Homeनगरसंगमनेरची बाजारपेठ गर्दीने फुलली

संगमनेरची बाजारपेठ गर्दीने फुलली

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याचा

- Advertisement -

सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, शेती, व्यापार अशा विविध क्षेत्रात मोठा लौकिक आहे. करोना संकटातही अमृत उद्योग समूहातील साखर कारखाना, राजहंस दुध संघ यांसह विविध सहकारी संस्थांनी शेतकरी, दुध उत्पादक, कामगार व नागरिकांना भरघोस मदत केल्याने संगमनेर शहरातील बाजारपेठ खरेदीसाठी फुलली आहे.

संगमनेर शहरात व तालुक्यात आर्थिक विकासाची समृध्दी असल्याने संगमनेरची ही बाजारपेठ जिल्ह्यात सर्वात मोठी ठरत आहे. नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील अमृत उद्योग समूहातील सहकारी साखर कारखाना, राजहंस दुध संघ तसेच विविध सहकारी संस्थांमधून सुमारे 100 कोटी रुपये बाजारात आल्याने मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.

सध्या शहरातील सर्व बाजारपेठ फुलली असून सर्वसामान्य नागरिकांनी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सचे पालन व मास्कचा वापर करुन मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या ठिकाणी कपडे, सोने, विविध गाड्या आदी वस्तू खरेदी करण्यासाठी नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून ही नागरिक संगमनेरमध्ये येत असतात. दिवाळीनिमित्त थोरात कारखाना, संगमनेर दूध संघ, एस.आर. थोरात, मालपाणी उद्योग समूह तसेच विविध संस्था, पतसंस्था, दूध संस्था आदींनी शेतकर्‍यांना व कर्मचार्‍यांना चांगले लाभांश, बोनस व रेबिट वाटप केले आहे.

त्यामुळे संगमनेरच्या बाजारपेठे मध्ये कपडे, सोने आदी वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक व शेतकरी येत आहेत. नविन नगर रोड, मेनरोड, बाजारपेठ, नाशिकरोड आदि रस्त्याच्या कडेला आकाश कंदील, झेंडूची फुले, लक्ष्मी मुर्ती आदी विक्री करणारे स्टॉलही मोठ्या प्रमाणात असल्याने याही स्टॉलवर नागरिक खरेदीसाठी दिसत आहे.

राज्यात काही ठिकाणी व्यापारी वर्ग हवालदिल असतांना संगमनेरमध्ये मात्र दुकानदार आपल्या दुकानाची गर्दीमुळे शेटर बंद करत आहे.खरेदीसाठी नंबर लावावे लागत आहे. सर्वत्र उत्साह, आनंद व चैतन्य असल्याने संगमनेर तालुक्याची दिवाळी आनंदात आहे. नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असलेल्या सुसंस्कृत राजकारणामुळे संगमनेर तालुका राज्यात वैभवशाली व विकसीत ठरला आहे. रस्त्या रस्त्यांवर बालगोपाळ व चिमुकल्यांची धांदल माहेरवासणी, सासरवासणींची लगबग या आनंदमय वातावरणामुळे तालुक्यात चैतन्य संचारले आहे.

नागरीकांनी सतर्कता बाळगावी- ना. थोरात

करोनाचे संकट अद्याप संपलेले नसून दिवाळी सण साजरा करतांना व खरेदी प्रसंगी प्रत्येक नागरिकाने सतर्कता बाळगणे बरोबर मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सचे पालन करावे. विनाकारण गर्दी करु नये. यावेळेच्या दिवाळीत भावनेपेक्षा वस्तूस्थितीला महत्त्व द्यावे. आणि प्रदूषण विरहीत फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार थोरात यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या