Friday, May 3, 2024
Homeनगरसाकुरचे दोन हॉस्पिटल सील !

साकुरचे दोन हॉस्पिटल सील !

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

करोना बाधित रुग्णांवर बेकायदेशीररित्या उपचार करताना आढळल्याने तालुक्यातील साकुर येथील दोन रुग्णालयांना सील ठोकण्यात आले आहे. प्रांताधिकार्‍यांनी काल सायंकाळी ही कारवाई केली. बेकायदेशीर उपचार करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, साकुर येथील डॉ. अविनाश रासने यांच्या श्री समर्थ हॉस्पिटल व डॉ. संजय टेकूडे यांच्या ओम साई हॉस्पिटल या रुग्णालयांमध्ये बेकायदेशीर रित्या करोना बाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. याबाबत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना माहिती समजली.

साकुर येथे जाऊन त्यांनी ही कारवाई केली. याप्रसंगी तहसीलदार अमोल निकम, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे हे उपस्थित होते. या रुग्णालयांमध्ये विनापरवाना रॅपिड अ‍ॅन्टीजेन किट द्वारे करोना रुग्णांची तपासणी सुरू असल्याचे आढळले. यामुळे या रुग्णालयांना सील ठोकण्यात आले. रुग्णालयांची अधिक चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यासाठी साकुर येथील ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना यावेळी प्रांताधिकारी यांनी सूचना केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या