Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : "एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिल्लीतील महाशक्तीचा हात"; राऊतांच्या दाव्याने खळबळ

Sanjay Raut : “एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिल्लीतील महाशक्तीचा हात”; राऊतांच्या दाव्याने खळबळ

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला आहे.महायुती २३४ जागा जिंकून राज्यातील मोठी युती ठरली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे असलेले मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तर राज्याच्या गृहखात्यावरुन भाजप (BJP) आणि शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena Shinde Faction) जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होऊ शकतात, असे ट्विट केले आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Shrikant Shinde : महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार का? अखेर श्रीकांत शिंदेंनी स्वत:च दिलं स्पष्टीकरण

राऊत यांना माध्यम प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरोधी पक्षनेते होऊ शकतात असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केले आहे असे विचारले असता ते म्हणाले की,”या देशातला विरोधी पक्ष संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यामागे जे रुसवे फुगवे सुरू आहेत, मला वाटतं त्यामागे दिल्लीतील महाशक्ती कार्यक्रम करत आहे. दिल्लीतील एखाद्या महाशक्तीशिवाय एकनाथ शिंदे अशाप्रकारचे धाडस करू शकत नाही. कारण कोणाची सध्याच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांविरोधात अशाप्रकारे रुसवे फुगवे करण्याची कोणाची हिंमत नाही”, असे त्यांनी म्हटले. तसेच काल अजित पवार दिल्लीत होते. त्यांनी अनेक भेटीगाठी गुप्तपणे घेतल्या. सरकार महाराष्ट्रात स्थापन होत आहे आणि हे अनेक नेते दिल्लीत फिरत आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी भाजपला वाटत नाही. अशा परिस्थितीत जे सरकार स्थापन होणार आहे तो एक फार मोठा विनोद असेल, अशी टीकाही यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर जय्यत तयारी

पुढे ते म्हणाले की, “हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवून येत आहे. ज्यांनी मतदान केलं, त्यांचा आपण केलेल्या मतदानावर किंवा निवडून आलेल्या सरकारवर विश्वास नाही. लोक शंका घेत आहेत. यावर निवडणूक आयोगाने खुलासा केला पाहिजे. आज मारकडवाडीत १४४ कलम लावला असून लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत. अजून राज्यात सरकार यायचं आहे. त्या मतदारसंघातून (Constituency) भाजपचा पराभव झाला आहे. पण मतदारांना वाटतंय विजयी उमेदवाराला जी मते मिळाली आहेत ती कमी मते आहेत. जिंकून सुद्धा फेरमतदान घेत आहेत, कारण कमी मतदान झाले आहे”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...