मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीत तब्बल २३४ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) मोठा धक्का बसला आहे. महायुतीमध्ये भाजपला (BJP) सर्वाधिक १३२, शिवसेनेला (एकनाथ शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादीला (अजित पवार) ४१ जागांवर विजय मिळाला आहे.विधानसभा निकाल लागून आठ दिवस उलटून गेले तरी अद्याप महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झालेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे संर्पूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
हे देखील वाचा : Shrikant Shinde : महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार का? अखेर श्रीकांत शिंदेंनी स्वत:च दिलं स्पष्टीकरण
दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होण्याआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दोन दिवसांपूर्वी एक्सवर (ट्विट) पोस्ट करत महायुतीचा शपथविधी गुरुवार (दि.५ डिसेंबर) रोजी आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता होईल, अशी माहिती दिली होती. त्यानुसार आता शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरु असून या सोहळ्याला तब्बल ४० हजार जणांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात एकूण तीन स्टेज उभारण्यात येणार आहेत.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : भाजपचा गटनेता निवडण्यासाठी निरीक्षक ठरले
मिळालेल्या माहितीनुसार, या शपथविधी सोहळ्याचा (Oath Ceremony) मुख्य स्टेज हा ६० बाय १०० बाय ८ फुट उंचीचं असणार आहे. या स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असतील. तर उजव्या बाजूला ८० बाय ५० बाय ७ फुट लांबीचा स्टेज राहणार असून यावर सर्व साधू-महंत उपस्थित असणार आहेत. तसेच डाव्या बाजूला ८० बाय ५० बाय ७ फुटाचा एक स्टेज राहणार असून यावर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि साऊंड सिस्टीम असणार आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Winter Session 2024 : हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला
तसेच मुख्य स्टेजच्या उजव्या बाजूला खासदार आणि आमदार (MP and MLA) यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी ४०० खुर्च्या असणार आहे. तर बाजूला आणि मुख्य स्टेजच्या समोर व्ही व्हिआयपींची आसनव्यवस्था करण्यात आली असून याठिकाणी जवळपास एक हजार खुर्ची असणार आहे.याशिवाय स्टेजच्या डाव्या बाजूला महायुतीमधील मुख्य पदाधिकारी यांच्यासाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे.तर कार्यकर्त्यांसाठी सात विभागात बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण स्टेजच्या बाजूला ६ बाय १६ उंचीचे कटआउट लावण्यात येणार आहेत.
हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? भुजबळांच्या वक्तव्याने संभ्रम वाढला
त्यासोबतच महायुतीला मत देणाऱ्या लाडक्या बहिणींना देखील या शपथविधीसाठी विशेष निमंत्रण देण्यात आले असून त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आले आहे. तसेच १३ विशेष ब्लॉकमध्ये लोकांच्या बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.तर कार्यकर्ते यांच्यासाठी एकुण तीन प्रवेशद्वार असणार असून मुंबई महापालिकेसमोर हे प्रवेशद्वार असणार आहे. तसेच व्हीआयपी यांच्यासाठी एकूण तीन प्रवेशद्वार राहणार असून फॅशन स्ट्रीट कडून व्हीआयपींना प्रवेश दिला जाणार आहे.