Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: मविआ, इंडि आघाडी विधानसभा लोकसभेसाठी होती, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नाही;...

Sanjay Raut: मविआ, इंडि आघाडी विधानसभा लोकसभेसाठी होती, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नाही; राऊतांच मोठं विधान, मनसे युतीबद्दल काय म्हणाले?

मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती इंडिया आघाडीचा भाग नाही, हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विषयावर केंद्रीय स्तरावर चर्चा होत नाही. शिवसेना-मनसे एकत्र येण्याचा निर्णय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र घेतला आहे, आणि त्यासाठी ते समर्थ आहे. असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. ते आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी आणि इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी तयार झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेत अद्याप कुठलीही आघाडी नाही. मराठी माणूस आणि मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्यामुळे युतीबाबत हे दोन्ही बंधू निर्णय घेण्यास सक्षम आहेत असं मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती हा इंडिया आघाडीचा विषय नाही. हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर राष्ट्रीय स्तरावर कधी चर्चा होत नाही. काही जण दिल्लीत पक्षप्रमुखांशी चर्चा करत असतील. परंतु ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतलेला आहे. ही महाराष्ट्राची मोठी घडामोड आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे यावर चर्चा होत असते. दोन बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत कुणालाही आक्षेप नाही. मराठीच्या प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळ यांनीही भूमिका मांडली आहे. आम्ही राजकीय दृष्ट्‍या एकत्र आलो त्याचा केंद्रबिंदू मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान आणि महाराष्ट्राचं रक्षण हाच आहे. शरद पवार असतील, राज्यातील काँग्रेसचे प्रमुख असतील या सर्वांची भूमिका मराठीबाबत समान आहे. आम्ही सगळे त्यासाठी एकत्र आलो होतो असं त्यांनी सांगितले.

YouTube video player

पुढे संजय राऊत असे ही म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, आणि मुंबई वाचण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यायचे ठरवले असेल तर मराठी जनतेला स्वाभिमानी जनतेला त्याचा आनंद असेल. राज ठाकरे यांनी परप्रांतीच्या विरोधात कोणती भूमिका घेतली नाही, कधीकाळी शिवसेनेवरती आरोप होत होते, महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता आले पाहिजे. अशा प्रकारचे आंदोलन सध्या बंगालमध्ये सुरू आहे, ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये भाषा आंदोलन सुरू केले, तामिळनाडूमध्ये तेच आंदोलन सुरू आहे, मग तुम्ही महाराष्ट्रावर का आक्षेप घेत आहात? आम्ही मराठी बोलतो म्हणून आणि मराठी बोला असे सांगत आहोत म्हणून मराठी बोलणार नाही, असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा महाराष्ट्रात लोकांच्या रागाचा भडका उडतो आणि तो स्वाभाविक आहे, असे संजय राऊत म्हणाले.

तसेच आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो, महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी तयार झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अद्याप कुठली आघाडी निर्माण झाली नाही. प्रत्येक महापालिका, जिल्हा परिषद क्षेत्रात स्थानिक आघाडी निर्माण होते हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यात बऱ्याचदा राजकीय पक्षही नसतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार त्या त्या शहरातील, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना असतात. मुंबई हा विषय वेगळा असल्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ आहेत असे संजय राऊतांनी स्पष्ट केले.

तुमची दादागिरी फडणवीसच रोज मोडून काढत आहेत
काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे वरळी कोळीवाड्यात एकाच कार्यक्रमात आमने- सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावर बोलताना राऊत म्हणाले, वरळी कोळीवाड्यात आदित्य ठाकरे असताना राज्याचे उपमुख्यमंत्री पोलिस घेऊन दादागिरी करत होते, जास्त दादागिरी करू नका तुमची दादागिरी मोडून काढली जाईल, इतक लक्षात ठेवा. तसेच तुमची दादागिरी ही देवेंद्र फडणवीसच रोज मोडून काढत आहेत. आम्ही कोणत्याही संघर्षासाठी आता तयार आहोत, असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदेंना थेट इशारा दिला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...