Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: "तुम्ही अमित शाहांचे टेस्ट ट्युब बेबी…"; संजय राऊतांची शिंदेसेनेवर बोचरी...

Sanjay Raut: “तुम्ही अमित शाहांचे टेस्ट ट्युब बेबी…”; संजय राऊतांची शिंदेसेनेवर बोचरी टीका

मुंबई | Mumbai
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि, १७ डिसेंबर) पत्रकार परिषद घेत लवकरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आघाडीची घोषणा करतील. जागा वाटपाची बोलणी ही अंतिम टप्प्यात आली असून शेवटचा हात मारायचा बाकी आहे. एक दोन दिवसात यााबबत तुम्हाला अपेक्षित असलेली मोठी घोषणा होईल असे सांगितले. तर, १९ तारखेला देशाच्या राजकारणात मोठा स्फोट होणार असल्याची चर्चा सुरू असल्याच्या काही अशी माहिती समोर येत आहे ज्यामुळे भारतात मोदींना सत्तेवर राहता येणार नाही अशी चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाणांनीही हे म्हटले आहे. त्यामुळे १९ तारखेची वाट पाहावी लागेल असे विधान राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आघाडीची घोषणा येत्या दोन दिवसात करतील असे सांगितलं. ते म्हणाले, ‘आमच्यात कोणताही विसंवाद नाही. आमचे घर दोघांचे आहे. काँग्रेसच्या बाबातीत बोलायचे झाले तर त्यांना त्यांचे स्वबळ दाखवायचे आहे. आमची शरद पवार यांच्यासोबत देखील चर्चा सुरू आहे. मी शरद पवार यांना दोन दिवसात भेटणार आहे. मुंबईत शिवसेना अन् मनसे हे दोन प्रमुख पक्ष आहेत.’

- Advertisement -

अंधभक्तांना कायमचे कोमात पाठवणारी माहिती
संजय राऊत पुढे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांचे राजकीय विश्लेषण आहे. १९ डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेत किंवा बाहेर काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. या भारतासंदर्भात काही महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. खासकरून पंतप्रधान मोदी आणि भाजपाबाबत असणार आहे अशी चर्चा अमेरिकेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. ही माहिती अत्यंत स्फोटक, धक्कादायक आणि अंधभक्तांना कायमचे कोमात पाठवणारी माहिती आहे. त्यानंतर जी फजिती भाजपा नेत्यांची होणार आहे त्यामुळे त्यांना सत्तेत राहता येणार नाही अशा प्रकारचे विश्लेषण समोर आले आहे असे त्यांनी सांगितले.

YouTube video player

तुम्ही अमित शाहांचे टेस्ट ट्युब बेबी
‘आता यांना बुडबुडे यायला लागले. यापूर्वी शिवतीर्थावर फक्त शिवसेनेच्याच सभा झाल्या मग ती सुरुवात असो किंवा सांगता. शिवतीर्थाशी शिंदे गटाचा काय संबंध? हे त्यांनी एकदा सांगावे. अमित शाह यांनी पक्ष तुमच्या ताब्यात दिला म्हणजे तुमचा शिवतीर्थाशी संबंध नाही. तुम्ही अमित शाह यांचे टेस्ट ट्युब बेबी आहात… तुमचा जन्म नैसर्गिक नाही. निवडणूक आयोगाचे डॉक्टर, सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन तुम्हाला तात्पुरते जन्माला घातले आहे. तुमची व्यवस्था तात्पुरती असल्याने शिवतीर्थावर सभा वगैरे गर्जना करु नका’, असा घणाघात राऊतांनी केला.

शिंदे भाजपची युती म्हणाजे अमिश शाहांनी लादलेले लग्न
भाजपने शिवतीर्थावर कधी सभा घेतल्या? हे त्यांनी सांगावे अशा शब्दांत खडसावत, शिवतीर्थाचा संबंध हा ठाकरेंचाच आहे या वाक्यावर त्यांनी जोर दिला. मनसेने केलेली सभेची मागणी नैतिक आणि भावनिकदृष्ट्या योग्यच आहे असे म्हणत भाजप आणि शिवसेना जागावाटपाच्या बाबतीत टप्पाटप्पाच खेळतात असा टोला लगावला. शिंदेंची शिवसेना आणि भाजपची युती म्हणजे, ‘हे अमित शाह यांनी लादलेले लग्न आहे. ते मनाने तर मोडलेले आहे. कारण ही जी वधू आहे, मिंधे…शिंदे… तिला काही करुन भाजपच्या चरणाशी बसायचच आहे. त्यातूनच सगळे गोंधळ सुरू आहेत’, असे म्हणत राऊतांनी टीका केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिव्हिलची ‘शल्यक्रिया’ कधी होणार ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिव्हिल हॉस्पिटल हे खरंतर गोरगरिबांना चांगले उपचार मिळवून देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठिकाण. तेथे आरोग्याच्या दर्जेदार...