Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्याकाश्मिरी पंडितांच्या हत्या प्रकरणावरून राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले...

काश्मिरी पंडितांच्या हत्या प्रकरणावरून राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा सातत्याने भाजप आणि शिवसेनेवर (BJP and ShivSena) हल्लाबोल सुरू आहे. त्यातच आता राऊतांनी मोदी सरकारने ३७० कलम हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काश्मिरात पंडितांच्या हत्येचे सत्र सुरू असल्याचा आरोप करत मोदी सरकारवर ( Modi Government) निशाणा साधला आहे…

- Advertisement -

यावेळी राऊत म्हणाले की, काश्मिरमध्ये (Kashmir) ८ दिवसांपूर्वी संजय शर्मा यांची बायको समोर हत्या झाली. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण होत आहे. काश्मिरी पंडितांची हत्या सुरू आहे. आजही आक्रोश सुरू आहे, भाजपचा एकही नेता गेला नाही. ३७० कलामांचा कोणालाही फायदा झाला नाही. मी स्वत: जाऊन याची पाहणी केली आहे, पण आज एकही भाजपचा नेता काश्मिरमध्ये गेला नाही, असे राऊतांनी म्हटले.

तहसील कार्यालयातील वाहनचालक दीड लाखांची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप-शिवसेनेने मोठी रणनीती आखली आहे. मुंबईच्या सहाही लोकसभा मतदारसंघांत दुचाकी फेरीच्या माध्यमातून आशीर्वाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना-भाजपच्या या यात्रेवरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे.

शिवतारेंच्या ‘त्या’ आरोपावर सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात दिले उत्तर; म्हणाल्या…

राऊत म्हणाले की, तुम्ही जितक्या यात्रा काढाल, तेवढी तुमची गद्दारी आणि बेईमानीपणा दिसून येईल. मुळापासून हादरले आहेत म्हणून ते यात्रा काढत आहेत. त्यांनी कितीही यात्रा काढा, काहीही फरक पडणार नाही’ असे त्यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेवर बोलताना राऊत म्हणाले की, ‘प्रत्येक तालुक्यात शिवसेना नेते पोहोचले आहेत. आज खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. कोकणातील ही अतिवराट सभा आहे. सेनेबाबत कोकणाचे प्रेम आहे. अशाच सभा महाराष्ट्रात होतील. यानंतर मालेगावमध्ये (Malegaon) सभा होईल’ असे त्यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या