Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut : आशिया चषक जिंकल्यानंतरही संजय राऊत भारतीय संघावर संतापले; म्हणाले,...

Sanjay Raut : आशिया चषक जिंकल्यानंतरही संजय राऊत भारतीय संघावर संतापले; म्हणाले, “रक्तात देशभक्ती होती तर…”

मुंबई | Mumbai

भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या (Indian Team) अंतिम सामन्यात पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळविला. या मालिकेत भारतीय संघाने तिसऱ्यांदा पाकिस्तानला (Pakistan) धूळ चारली आहे. या विजयानंतर भारतीय संघावर राजकीय नेत्यांपासून, अभिनेते ते उद्योगपतींकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -

भारताने आशिया चषक (Asia Cup 2025) जिंकल्यानंतर पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीकडून विजयाची ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यावरून मैदानात चांगलाच राडा झाल्याचे बघायला मिळाले. मात्र, त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) एक व्हिडीओ शेअर करत भारतीय संघांवर टीका केली आहे.

YouTube video player

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटमध्ये म्हटले की,”आशिया कपच्या सुरुवातीला १५ दिवसांपूर्वी पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नक्वीसोबत हात मिळवला, फोटोही काढला. आता हे लोक देशाला नौटंकी दाखवत आहेत. एवढी राष्ट्रभक्ती रक्तात होती, तर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला मैदानातच उतरायला नको होतं. वरून खालीपर्यंत सगळीकडे फक्त ड्रामा एके ड्रामाच आहे. भारताची जनता मूर्ख नाही. ” असे ते म्हणाले आहेत.

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

खासदार संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यासोबत हात मिळवणी करताना दिसत आहे. तसेच दोघांमध्ये संवाद देखील झाला असून ते हसताना देखील दिसत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...