Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj-Uddhav Thackeray: मोठी बातमी! राज-उध्दव ठाकरे एकत्र येणार, हिंदी भाषा सक्तिविरोधात ५...

Raj-Uddhav Thackeray: मोठी बातमी! राज-उध्दव ठाकरे एकत्र येणार, हिंदी भाषा सक्तिविरोधात ५ जुलैला मोर्चा काढणार; संजय राऊतांची घोषणा

मुंबई | Mumbai
हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे पुरस्कृत मोर्चा ५ जुलैला तर ७ तारखेला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीच्या एल्गाराची घोषणा केली होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली होती. हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले असून ते एकत्र मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली होती पण याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही एकत्र मोर्चासाठी हालचाली सुरु होत्या. यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रतील शाळात हिंदीसक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे हिंदीसक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक्सवर पोस्ट करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाबाबत माहिती दिली. संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो पोस्ट केला. या फोटोवर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!’ संजय राऊत यांनी ही पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील टॅग केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात सध्या हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली असून त्यास विरोध होत आहे. त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर हिंदी भाषा लादली जात आहे. हे हिंदी भाषेचे ओझे आमच्या मुलांना पेलवणार नाही, असे भाषातज्ज्ञांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील अनेक राज्यांची तशीच भूमिका आहे. आमचा काही हिंदी भाषेला विरोध नाही. मात्र, शालेय शिक्षणात अशा प्रकारची जबरदस्ती आम्ही खपवून घेणार नाही. या त्रिभाषा सूत्रातून गुजरात राज्याला मात्र वगळले आहे आणि महाराष्ट्रावर सक्ती केली जात आहे. याला मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्था-संघटनांनी विरोध करत ७ जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले होते. त्यास उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता.

YouTube video player

दरम्यान, मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूचा एकत्र मोर्चा निघणार असल्याचे संजय राऊत यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या लढ्याचे नेृत्तत्व ठाकरेंनाच करावेच लागेल. वेगळे मोर्चे निघणे बरे दिसत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले असून तसा राज ठाकरेंचा मला फोन आला. राज ठाकरेंच्या फोननंतर मी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. उद्धव ठाकरेंनीदेखील एका मोर्चाच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. मराठी माणसांमध्ये कोणतीही फूट नाही. ठाकरे बंधू मनाने एकत्र आलेलेच आहेत, असेही त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे. मोर्चासाठी सकाळी १० ची वेळ सोयीची नाही. यामुळे वेळत बदल होईल. पण आम्ही सर्वजण या मोर्चात सहभागी होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

मनसे नेते संदीप देशपांडे काय म्हणाले?
मला तर वाटतं, मराठी माणसाची एकत्र ताकद दिसणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांनी काल आवाहन केलं होतं, त्याला समोरुन प्रतिसाद मिळाला. मराठी भाषेची गळचेपी आणि हिंदी भाषेचीसक्ती लादण्याचा प्रयत्न होतोय, त्याविरोधात मराठी माणसाने एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. मराठी भाषा हा राजकीय मुद्दा नाही. मराठी भाषेपुढे कोणीही छोटं-मोठं नाही, सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. यासाठी राज ठाकरे सकारात्मक आहेत, आम्ही सगळे सकारात्मक आहोत.

गुरूवारी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत मनसेने हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गट ७ जुलै रोजी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. पण त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Accident News : राहुरी विद्यापीठाजवळील अपघातात जखमी महिलेचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी कृषी विद्यापीठाजवळ नगर-मनमाड महामार्गावर 2 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान...