Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्या...अशांना आम्ही श्रद्धांजली वाहतो; नीलम गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊत हे काय...

…अशांना आम्ही श्रद्धांजली वाहतो; नीलम गोऱ्हेंवर टीका करताना संजय राऊत हे काय बोलून गेले..

मुंबई | Mumbai

शिवसेना ठाकरे गटाच्या (Thackeray Group) प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शुक्रवारी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटामध्ये (Eknath Shinde Group) प्रवेश केला. नीलम गोऱ्हेंच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.

- Advertisement -

संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका करताना सांगितले की, नीलम गोऱ्हे यांना ५ वेळा आमदार केले. त्यांना मिळालेले वैधानिक पद शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाले. असे सोडून गेल्याबद्दल लाज वाटते आणि महाराष्ट्राला सुद्धा नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल लाज वाटते. ४ ते ५ महिन्यांसाठी आपले पद वाचवण्यासाठी नीलम गोऱ्हे पक्ष सोडून गेल्या. अशा लोकांना आम्ही श्रद्धांजली वाहतो. संजय राऊतांनी पुढे सांगितले की, ‘महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेच्या मनातील साकडे घालायला मी आलोय. राज्याची ओळख संतांची भूमी नसून आता गद्दारांची भूमी म्हणून ओळख होत आहे. त्यामुळे ही ओळख पुसण्याची पांडुरंग शक्ती देवो. यशवंतराव, अनेक मेहापुरुषांच्या नावाने ओळखला जाणारा महाराष्ट्र आता गद्दार यांच्या नावाने ओळखला जातोय. हुकूमशाही , दडपशाही , पैशाचे राजकारण सुरू आहे. यासाठी सर्व घटकांनी एकत्र यावे.’

“माझे राजकीय करिअर संपवण्याचा डाव, सोनिया गांधी, राहुल गांधींना…”; काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी मांडली भूमिका

संजय राऊत आमच्यामुळे राज्यसभेत गेले आहेत. त्यांनी लोकांमधून निवडून यावे. आपल्या पदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, असं आव्हान शिंदे गटाच्या आमदारांकडून दिलं जात आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी कोणतीच निवडणूक लढवणार नाही. माझ्या पक्षाने मला राज्यसभेत पाठवलं. माझ्या पक्षाचं नेतृत्व करत असतो. मी माझ्या पक्षाची बाजू मांडत असतो, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. चार दिवस उलटले तरी अजूनही अजित पवार गटाच्या मंत्र्यांना खाती दिली नाहीत. त्यावरूनही राऊत यांनी अजित पवार यांना टोला लगावला. भाजपच्या तंबूत जावून टिकणं सोपं नाही. एकटी शिवसेनाच आहे २५ वर्ष राहून बाहेर पडली, असं चिमटा राऊत यांनी काढला.

NCP Crisis : घरी बसून आशीर्वाद द्या म्हणता, तुमच्यापेक्षा आम्ही मुली बऱ्या; सुप्रिया सुळेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

- Advertisment -

ताज्या बातम्या