Wednesday, May 22, 2024
Homeमुख्य बातम्याअडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून कोणी रोखले?; संजय राऊतांचा मोदींना थेट सवाल

अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून कोणी रोखले?; संजय राऊतांचा मोदींना थेट सवाल

मुंबई | Mumbai

लालकृष्ण आडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून पंतप्रधानांनी रोखले का?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एनडीएच्या खासदारांची बैठक झाली. शरद पवार (Sharad Pawar) यांना पंतप्रधान होण्यापासून काँग्रेसने रोखले, असे वक्तव्य पंतप्रधानांनी केले होते. म्हणून शरद पवारांचा पक्ष फोडला का? आणि अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून पंतप्रधानांनी रोखले का?, असे सवाल संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

- Advertisement -

शरद पवार यांना पंतप्रधान होण्यापासून काँग्रेसने रोखले, असे पंतप्रधानांनी म्हटले, पत्रकारांच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, शरद पवारांविषयी तुम्हाला ऐवढा आदर आहे. म्हणून पंतप्रधानांनी शरद पवारांचा पक्ष फोडलात का?, असा उलट सवाल त्यांनी केला. संजय राऊत पुढे म्हणाले, शरद पवार आणि काँग्रेस यांचे वेगळे राजकारण आहे. आम्ही असे म्हणतो का की लालकृष्ण आडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून पंतप्रधानांनी रोखले किंवा अडवाणींना राजकीय संन्यास घेण्यास सांगितला. हा पक्षा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच शरद पवार आणि काँग्रेस हा दोन्ही पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे.

शिवसेनेने आमची साथ सोडली, असे पंतप्रधान म्हणाले, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान हे जनतेची दिशाभूल करत आहेत. २०१४ ची परिस्थिती पंतप्रपधानांनी आठवायला हवी. २०१४ शिवसेनेची साथ कोणी आणि का सोडली, हे संपूर्ण देशाने पाहिले. यानंतर शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली. आपली युती तुटली आपण वेगळे झालेलो आहोत, असे भाजपकडून अधिकृतपणे एकनाथ खडसेंनी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितला. त्यामुळे शिवसेनेची साथ कोणी सोडली. यासंदर्भात पंतप्रधानांनी जुना रेकॉर्ड तपासून पहावा. महाराष्ट्र सदनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेकांचे भव्य पुतळे उभे केले आहे. त्यांच्या साक्षीने तरी इतिहास, भूतकाळ आणि सत्य मोडून तोडून टाकू नये.

तसेच, या देशात हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. तरी हिंदू-मुस्लिम करत आहेत? देशात दंगे का होत आहेत? काँग्रेसच्या काळात हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में है… असं भाजप म्हणत होतं. आता मागच्या दहा वर्षापासून तुमचं सरकार आहे. मग हिंदू खतरे में कसा आला? का आला? जर हिंदू खतरे में है, तर राजीनामा द्या, असा घणाघातही राऊतांनी केला आहे. नरेंद्र मोदी सामना वाचतात. सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे. त्यांना अजूनही शिवसेनेची दखल घ्यावी लागते. सामनातील भूमिका शिवसेनेच्या अधिकृत भूमिका आहे. त्यांना यासाठी दखल घ्यावी लागते. कारण आम्ही ओरिजनल आहोत. सामना आणि ठाकरे शरण जात नाहीत. हे त्यांनी बोलून दाखवलं आहे, असंही राऊत म्हणालेत.

नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसमधील घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. तसेच, शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डालवण्यांचं काम केलं. सत्तेत असताना चुकीची कामे करणाऱ्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. नंतर निवडणूक प्रचारावेळी या नेत्यांनी केलेल्या चुकांची माफीही मागितली. काँग्रेसप्रमाणे भाजपा अहंकारी नाही. २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा विजय होणार, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या