Friday, April 4, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: "माझ्या नादी लागू नका, नाही तर तुला"…; खासदार संजय राऊतांचा...

Sanjay Raut: “माझ्या नादी लागू नका, नाही तर तुला”…; खासदार संजय राऊतांचा प्रफुल्ल पटेलांना इशारा

नवी दिल्ली | New Delhi
वक्फ सुधारणा विधेयकावरून गुरुवारी, राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. राज्यसभेतील चर्चे दरम्यान सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज चांगलेच संतापले. पटले यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काही विधानांचा उल्लेख करत राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, राऊतांनी, ‘आम्ही भिऊन तिकडे गेलो नाही,’ असे म्हटले. यालाही पटेलांनी उत्तर दिले. यावेळी सभापती जगदीप धनखड हसत होते. पण आता याच मुद्द्यावर भाष्य करत खासदार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेलांचे वाभाडे काढत त्यांना इशारा दिला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज चांगलेच संतापले. “माझ्या नादी लागू नका, नाही तर तुला नागडा करेल” अशी संतप्त प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता या दोन नेत्यांमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी (ता. 4 एप्रिल) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशाचा सर्वात मोठा दुश्मन पाकिस्तानात बसला आहे. त्याच्याशी प्रफुल्ल पटेल यांचे संबंध आहेत. म्हणजे ते दाऊदच्या पक्षातून भाजपात गेले आहेत. भाजपात गेले कारण त्यांना त्यांची संपत्ती वाचवायची होती. तसेच तुरुंगात जाण्याची भीती असल्याने प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सर्व संबंधांसह भाजपात गेले. राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणाऱ्या अमित शहा यांनी त्यांना पक्षात धुवून घेतले. त्यांचे वॉशिंग मशीनने स्वच्छ केले. असे प्रफुल्ल पटेल संसदेत आहेत. याची लाज वाटते. दाऊदचे हस्तक भाजपाने आपल्या पक्षात घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगत आहेत, असा शब्दांत त्यांनी पटेल यांना सुनावले.

संजय राऊत यांनी म्हटले की, पटेलांसारखे लोकं कुणाचीच नाहीत हे दलाल आहेत. कधी काँग्रेसची दलाली करत होते, कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांना बाप बाप करत होते, कधी दाऊदची दलाली करत होते आणि इथे आल्यावर मग त्यांची संपत्ती मोकळी झाली. हजार भर कोटीची. अशा लोकांची संसदेत उभे राहून बोलण्याची लायकी आहे का?” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.

“आम्ही कसले रंग बदलले. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहोत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहोत. तुमचे रंग आधी पाहा. तुमचा रंग कोणता आहे. तुम्हाला दाऊद इब्राहीमचा हिरवा रंग लागला आहे. आणि तुम्ही वक्फवर बोलतात. मी प्रफुल्ल पटेलांना सांगतो माझ्या नादाला लागू नको. नागडा करीन मी” अशा शब्दात राऊतांनी प्रफुल पटेल यांना इशारा दिला. “तिथे भाजपच्या लोकांना चमचेगिरी करून दाखवत होते. अशा घाण दळभद्र्याच्या तोंडाला लागणे हे शत्रू आहेत महाराष्ट्राचे. कशाला प्रफुल्ल पटेल भेटल्यावर नमस्कार करतो. जणू काय आकाशातून निष्ठेचा एक मूर्तीमंत पुतळा पडलोय, फार मोठा राष्ट्रभक्त आहे, अशा पद्धतीने” अशी टीका राऊत यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Manoj Kumar Passes Away: बॉलिवुडचे ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्या आड! जेष्ठ...

0
मुंबई | Mumbaiज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांचे शुक्रवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मनोज कुमार...