Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! संजय राऊतांना मोठा झटका; 'या' खटल्यात १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा

मोठी बातमी! संजय राऊतांना मोठा झटका; ‘या’ खटल्यात १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना माझगाव न्यायालयाने अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवले आहे. राऊत यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांच्यावर शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्या प्रकरणात राऊत यांना आता माझगाव न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; ‘हे’ आहे कारण

YouTube video player

राऊत यांना माझगाव न्यायालयाने (Mazgaon Court) १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान संजय राऊत यांना आता रितसर न्यायालयासमोर (Court) हजर व्हावे लागेल, त्यानंतर ते तुरुंगवासाची शिक्षा कमी करण्याबाबत विनंती करु शकतात. तसेच संजय राऊत याप्रकरणी पुढील न्यायालयात जातात का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Accident News : नांदगाव-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, ४ जखमी

प्रकरण नेमकं काय आहे?

संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता.राऊत यांनी १२ एप्रिल २०२२ रोजी सामना वर्तमानपत्रातील लेखात लिहिले होते की, मेधा सोमय्या यांनी राजकीय ताकदीचा वापर केला. तसेच मीरा-भाईंदर परिसरातील १५४ पैकी १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट घेतले. या कंत्राटाचा वापर करून मेधा सोमय्या यांनी ३ कोटी ९० लाखांचा घोटाळ्याचा आरोप केल्याचे म्हटले होते. त्यावर मेधा सोमय्या यांनी माझगाव न्यायालयात मानहानीचा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता या खटल्यात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘त्या’ खुनामागे छेडछाड! तरुणाच्या हत्येनंतर जमावाची संशयिताच्या घरावर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पेठरोड परिसरातील (Peth Road Area) अश्वमेघ नगरात तरुणाची निघृण हत्या झाल्यानंतर या घटनेला रविवारी (दि. ४) भरदुपारी गंभीर वळण मिळाले....