Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रSanjay Raut : "संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट"; संजय राऊतांचा गंभीर...

Sanjay Raut : “संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

दोन दिवसांपूर्वी नागपुरात (Nagpur) भरधाव वेगात आलेल्या एका ऑडी कारने शहरातील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. यात काही जण जखमी झाले. तर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या ऑडी कारमुळे हा अपघात झाला त्या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांचा मुलगा संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याच्या नावे आहे. ही गाडी संकेतचा मित्र अर्जुन चालवत होता. याप्रकरणी अद्याप कोणतीही कडक कारवाई करण्यात आलेली नाही. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. तसेच संकेत आणि त्यांचे मित्र ज्या हॉटेलमध्ये जेवले, त्या बिलात बीफ कटलेटचा समावेश असल्याचा आरोप राऊतांनी केला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Weather : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, नागपुरात फडणवीसांच्या नाकासमोर एवढा मोठा अपघात झाला, १७-१८ जण हॉस्पिटलमध्ये आहेत. ज्याच्या मालकीचे वाहन आहे, त्याचं साधं नाव एफआयआरमध्ये नाही. प्रत्यक्ष ड्रायव्हिंग सीटवरुन अपघातानंतर त्याला बदलण्यात आलं, त्याला तुम्ही वाचवताय? तु्म्ही कसल्या कायदा सुव्यवस्थेच्या बाता करताय? त्या गाडीमध्ये लाहोरी बारचं बिल मिळालेलं आहे. त्यांच्या खाण्या-पिण्याच्या पदार्थांचं बिल समोर आणलं पाहिजे. त्यात दारुचं बिल आहे. हे आम्हाला हिंदुत्व शिकवतात, चिकन, मटण यांच्यासोबत बीफ कटलेटचंही बिल आहे. श्रावण आहे, गणपती आहेत, आम्हाला हिंदुत्व शिकवतात? पोलिसांनी बिल जप्त केले आहे. तुम्ही बिफ खायचं आणि लोकांचे बळी घ्यायचे, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा :  शिष्यवृत्तीत एकसमानता आणण्यासाठी समिती गठीत; सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जारी

कायदा सर्वांसाठी समान हवा

नागपुरात झालेला अपघात (Accident) जर एखाद्या सर्वसामान्य माणसाने केला असता, तर काय झालं असतं त्याचा विचार करा. एव्हाना पोलिसांनी त्या मुलाला, त्याच्या कुटुंबाला पकडून, त्याच्या मित्राला धरुन धिंड काढली असती. सलमान खान सुटतो, एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो, संकेत बावनकुळे सुटतो. मी तो कुणाचा मुलगा आहे, हे मानत नाही. तो कोणाचाही मुलगा असेल? कायदा सर्वांसाठी समान हवा आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

हे देखील वाचा : किरीट सोमय्यांनी नाकारला पक्षादेश; म्हणाले, “अशी अवमानास्पद वागणूक देऊ नका”

ही पापं कुठे फेडाल?

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत जे धिंडवडे काढले आहेत, त्याची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात केली जाईल. असा गृहमंत्री महाराष्ट्राला कधीही लाभला नाही. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. ज्याप्रकारे तुम्ही गृह खातं चालवत आहात, तुम्ही अनिल देशमुखांना अटक करायला निघाला आहात. पण तुमच्या पक्षातील एका नेत्याने दहा गाड्या चिरडून लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही अभय देताय, ही पापं कुठे फेडाल? अशा शब्दात संजय राऊतांनी संताप व्यक्त केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या