Wednesday, June 26, 2024
Homeनाशिक"नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले, मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण"; राऊतांच्या पोस्टमुळे...

“नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले, मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण”; राऊतांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आज देशासह राज्यभरात चौथ्या टप्प्यातील (Fourth Phase) मतदान (Voting) पार पडत असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मतदारांना मतदानासाठी सत्ताधाऱ्यांकडून पैशांचे प्रलोभन दाखविण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यासंदर्भातील पैसे वाटल्याचा एक व्हिडिओ अहमदनगरमधील मविआचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) कालच्या नाशिक दौऱ्याचा एक व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या बॅगेत पैसे असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी(सोमवारी) त्यांच्या सोशल मीडियावरील (Social Media) एक्स (ट्वीट) अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शिंदे हे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत आहेत. त्यांच्या अंगरक्षकांच्या हातात दोन बॅगा दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर राऊत यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या या व्हिडिओनंतर इतर विरोधकांनीही मुख्यमंत्री शिंदेंवर टीकेची झोड उठवली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर या बॅगांमध्ये नेमकं काय आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पंरतु, मुख्यमंत्री दोन तासांच्या नाशिक दौऱ्यासाठी इतक्या मोठ्या बॅगा घेऊन का आले?, असा सवाल विचारत राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत पोलीस यंत्रणेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच पोलीस इतक्या जड बॅगा घेऊन जात असताना निवडणूक आयोगाकडून या बॅगांची तपासणी का केली जात नाही? असाही प्रश्न उपस्थित करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांकडून पैसेवाटप केले जात असल्याचा आरोप केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या