Saturday, May 25, 2024
Homeमुख्य बातम्याSanjay Raut : "मुख्यमंत्री संकुचीत मनोवृत्तीचे, सरकारची घटिका भरली..."; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : “मुख्यमंत्री संकुचीत मनोवृत्तीचे, सरकारची घटिका भरली…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात सध्या चांगलाच पेटला असून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण (Hunger Strike) सुरु केले असून आज (०१ नोव्हेंबर) रोजी त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे…

- Advertisement -

Maratha Reservation : सर्वपक्षीय आमदारांनी ठोकले मंत्रालयाला टाळे; पोलिसांकडून धरपकड

अशातच आज मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र, सर्वपक्षीयांच्या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निमंत्रित न केल्यामुळे आता ठाकरे गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याबाबत ट्विट करून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Maratha Reservation : “मी स्वतः गृहखात्याला फोन करुन …”; गाडीची तोडफोड केल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “मनोज जरांगेंच्या उपोषणावर मार्ग निघणे गरजेचे आहे. संकोचीत मनोवृत्तीतून मार्ग निघणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीला ऐऱ्या गैऱ्या पक्षांना निमंत्रण दिले आहे. मात्र उद्धव ठाकरेंना बोलवण्यात आले नाही. यातून त्यांची संकोचीत मनोवृत्ती दिसते. अंबादास दानवेंना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले आहे. त्यांना उद्धव ठाकरेंची भीती असल्याने शिंदेंनी ठाकरेंना बोलावले नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

मराठा आणि धनगर आरक्षणासाठी ठाकरे गटाचं थेट राष्ट्रपतींना पत्र, केली ‘ही’ मागणी

पुढे ते म्हणाले की, “या सरकारचे करायचे काय? महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्लज्ज राजकारण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही. शिवसेनेचे १६ आमदार व ०६ खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण. एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले. पण शिवसेना यांच्या डोळ्यात खूपते. अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. ठीक. आम्हाला मानपान नको. पण प्रश्न सोडवा. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटिका भरलीच आहे. हिशोबाचे वेळ जवळ येत आहे. जय महाराष्ट्र!” अशा शब्दांत राऊतांनी टीकास्र सोडले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Maratha Reservation : “सरकारचा एकही निर्णय मान्य नाही, आंदोलकांना त्रास देऊ नका नाहीतर”…; जरांगे पाटलांचा इशारा

- Advertisment -

ताज्या बातम्या