Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: …ही स्टाईल नसून मग्रुरी, तुम्ही गोट्या खेळण्याच्याचं लायकीचे; संजय राऊतांकडून...

Sanjay Raut: …ही स्टाईल नसून मग्रुरी, तुम्ही गोट्या खेळण्याच्याचं लायकीचे; संजय राऊतांकडून अजित पवारांच्या विधानाचा खरपूर समाचार

मुंबई | Mumbai
राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांची पिके, फळबागा उद्धवस्त झाल्या आहेत, तर काही ठिकाणी जमीनच खरडून गेली आहे. शेतकऱ्यांनी साठवलेले धान्य, जनावरांसाठी साठवलेला चारा, जनावरे सगळे पूरात वाहून गेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्त भागात दौरा केला. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांचा दौरा केला.

दरम्यान, मराठवाड्यातील परिस्थितीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार आणि कर्जमाफी करावी अशी मागणीही केली. राऊतांनी अजित पवार यांच्या कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला उद्देशून केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत देखील विचारण्यात आलं. त्यावेळी संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.

- Advertisement -

काय म्हणाले संजय राऊत?
खासदार संजय राऊत यांना आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी, ‘अजित पवारांची ही स्टाईल नसून मग्रुरी आहे. मराठवाड्याचं दुःख त्यांना कळलं नाही. फडणवीस यांनी देखील राजकारण करू नको असं सुनावलं होतं. आम्हालाही असे प्रश्न विचारले. आम्ही मात्र अशी उत्तर दिली नाहीत. संजय राऊत पुढे म्हणाले, ‘अजित पवार तुम्ही गोट्या खेळण्याच्याचं लायकीचेच आहात. तुम्ही भ्रष्ट राज्यकर्ते आहात. ठाण्याचे उपमुख्यमंत्री स्वतःचे फोटो छापून मदत करत आहेत. अशी टीका त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. तसेच पंजाबचं उदाहरण पाहा. भगवंत मान यांनी तब्येत बरी नसताना देखील काम केल.केंद्राकडून निधी मिळत नव्हता, तरीदेखील त्यांनी पंजाबमध्ये हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. अस ते म्हणाले.

उध्दव ठाकरेंनी बांधावर जाऊन लोकांचं दुःख समजून घेतलं
राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी चिखलात, बांधावर आणि घरात जाऊन लोकांचे दुःख समजून घेतले. राऊत यांनी सांगितले की, कळंबमध्ये एका वृद्ध महिलेने “गरीबांच्या घरात कोणी येत नाही” असे म्हटल्यावर उद्धव ठाकरे त्या महिलेचा पत्ता विचारून तिच्या वाहून गेलेल्या घरात जाऊन बसले आणि तिचे दुःख ऐकले. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, “मी तुमच्यासाठी भांडतोय, कोणीही आत्महत्येचा विचार मनात आणू नये”. त्यांनी शेतकऱ्यांना लढण्याचे आवाहन केले.

तुमच्या डोक्यात सडकं राजकारण
संजय राऊत म्हणाले की, सरकार शासकीय शब्दकोशावर नाही, तर लोकभावनेवर चालते. ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा, ही लोकभावना आहे आणि सरकारने शब्दांचे अर्थ सांगत बसू नये, असे त्यांनी सुनावले. एका शेतकऱ्याने तत्काळ मदतीबद्दल विचारले असता, फडणवीसांनी त्याला “गप बस रे, राजकारण करू नको” असे म्हटले. यावर राऊत म्हणाले की, ज्या शेतकऱ्याचे सर्वस्व वाहून गेले आहे, तो मदतीबद्दल विचारत आहे, यात राजकारण कुठे आहे? तुमच्या डोक्यात सडकं राजकारण आहे, असे राऊत फडणवीसांना म्हणाले.

पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा
प्रधानंत्री सहायता योजना म्हणजे पीएम केअर फंड नावाचा एक प्रकार नरेंद्र मोदींनी त्यांच्या कारकिर्दीत सुरू केला. जेव्हा नैसर्गिक संकट, वैद्यकीय संकट, आपत्ती येईल, अशा वेळेला या फंडातून मोठ्या प्रमाणात मदत करता येईल म्हणून प्रधानमंत्री कार्यालयातचा वापर करुन पीएम केअर फंडाची स्थापना करण्यात आली. हा पीएम केअर फंड सरकारी आहे की खासगी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण त्याच्यातील जी रक्कम आहे ती देशाच्या बजेटपेक्षा मोठी असावी असे लोकांचे म्हणणे आहे. त्या पीएम केअर फंडात मुंबईसारख्या शहरातून सव्वा दोन लाख कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे पीएम केअर फंडातून, त्या पैशांचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे अशी मागणी राऊत यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या