Thursday, November 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: मर्जर-मर्जर, फार इंट्रेस्टिंग खेळ आहे, मोठे-मोठे खेळाडू आहेत; संजय राऊतांचा...

Sanjay Raut: मर्जर-मर्जर, फार इंट्रेस्टिंग खेळ आहे, मोठे-मोठे खेळाडू आहेत; संजय राऊतांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना टोला

मुंबई | Mumbai
राज्याच्या राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र आल्यास ते नेमक्या कोणासोबत युती करणार, इंडिया आघाडीत की महायुतीसोबत, असाही सवाल उपस्थित होत आहे. त्यातच काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विधानाने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. अशातच या एकत्रिकरणाबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याबाबत भाष्य केले आहे.

राष्ट्रीय स्पर्धांत एक नवीन खेळ आणला पाहिजे विलीनीकरण-विलीनीकरण
संजय राऊत सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आपण अनेक वर्ष हे ऐकतो आहोत. नकार कोण देत नाही, राष्ट्रीय स्पर्धांत एक नवीन खेळ आणला पाहिजे विलीनीकरण-विलीनीकरण, किंवा ऑलम्पिक खेळ खेळता येईल का? मर्जर-मर्जर, फार इंट्रेस्टिंग खेळ आहे, मोठे-मोठे खेळाडू आहेत. प्रफुल पटेल हे फिफाचे अध्यक्ष असतात, त्यांनी मर्जर मर्जर खेळ करावा. हा खेळ चांगला खेळला जातोय, त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर हा खेळ खेळला जावा यासाठी पवार यांच्या मार्गदर्शनात पत्र लिहीलं, अजून हे मर्जर हे गल्लीत खेळत आहेत, मधेच कोणी पीच उखडेल. मुख्यमंत्री स्वतः त्यात पंच म्हणून काम करतील. ते स्वतः फिक्स करतील अशा शब्दात संजय राऊतांनी टोला लगावला.

- Advertisement -

शरद पवार या नव्या खेळाचे मार्गदर्शक होणार नाहीत
“विलीनीकरणाचा हा खेळ सध्या गल्लीबोळात सुरू आहे आणि याचा चांगला सराव होत असल्याने ते हळूहळू दिल्लीमध्ये जातील. या सामन्याचा निकाल लागणारच नाही, कारण मध्येच पाऊस पडेल. शरद पवार या नव्या खेळाचे मार्गदर्शक होणार नाहीत, ते लोकांना खेळायला भाग पाडतील. पण ते स्वतः क्रिकेटच्या मैदानावर असतील.” असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठा धक्का; दोन एसपीओंची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या, शस्त्रेही गायब

महाराष्ट्रात हा खेळ उत्तम सुरू आहे याबाबत मी पंतप्रधानांना पत्र लिहणार आहे
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विलीनीकरणाच्या खेळात पंच म्हणून सहभागी होऊ शकतात. मला विचारा आणि निर्णय घ्या, म्हणजे निकाल आधीच फिक्स करा आणि मग खेळायला जा,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला. तसेच, “विलिनीकरण हा खेळ राष्ट्रीय खेळामध्ये आणला पाहिजे. ऑलिम्पिकमध्येही मर्जर खेळ आणला पाहिजे. महाराष्ट्रात हा खेळ उत्तम सुरू आहे. याबाबत मी पंतप्रधानांना पत्र लिहणार आहे,” असा मिश्कील टोला त्यांनी यावेळी लगावला.

अजून हे मर्जर मर्जर त्याच्यातले अजून ते गल्लीतच खेळतायत अजून गल्लीत खेळतात, पण जाईल हळूहळू राष्ट्रीय पातळीवर, यांची प्रॅक्टिस होते आहे, पण उत्तम खेळ आहे, तुम्ही पण खेळायला सुरुवात करा, आपण त्यात सहभागी व्हा, तुम्ही सगळे श्रोते आणि प्रेक्षक म्हणून, रिपोर्टर म्हणून मर्जर मर्जर खेळा, आपापल्या पद्धतीने ते उत्तम आहे, फार मनोरंजन होत आहे, सुवर्ण पदक कोण पटकावेल? या प्रश्नावर राऊत उत्तर देताना म्हणाले, हा सामना शेवटपर्यंत अनिर्णित राहील, अनिर्णित राहील.

ताज्या बातम्या

Ahilyanagar News : जिल्हा बँकेवर ‘सहकार विकास आघाडी’चे वर्चस्व; अध्यक्षपदी डॉ....

0
अहिल्यानगर | Ahilyanagar जिल्ह्याच्या राजकारणाचे आणि सहकार क्षेत्राचे केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया आज (गुरुवार दि. १२) रोजी...