Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याफडणवीसांबद्दलच्या 'त्या' विधानावर संजय शिरसाटांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले...

फडणवीसांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर संजय शिरसाटांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई | Mumbai

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावं आणि एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात ठेवावं, असं विधान शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी संजय शिरसाटांच्या विरोधात विधानं केली होता. आता शिरसाटांनी सारवासारव केली आहे.

- Advertisement -

संजय शिरसाट म्हणाले की, मी काल देवेंद्रजींबाबत त्यांनी केंद्रात जाव असं वक्तव्य केलं, ते अनेकांनी उलटं घेतलं, आम्ही जो उठाव केला त्यात फडणवीसांचीही भूमिका होती. माझा मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांची बढती व्हावी, या अनुषंगाने मी बोललो होतो. देवेंद्रजींनी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात २०२४ च्या निवडणुका होतील, असं म्हटलं आहे. त्यामुळे विरोधकांनी याचं भांडवलं केलं तरी याचा मला फरक पडत नाही. मात्र युतीतील नेत्यांनी यावर बोलू नये. कोणाला मुख्यमंत्री बनवायचं हे वरिष्ठ नेते ठरवतील.

शिरसाट पुढे म्हणाले, मी नगरसेवक होतो आमदार झालो आता मंत्रिपदाचे डोहाळे लागले, प्रत्येकला आशा असते. मी देवेंद्रजींबाबत बोललो त्यांना केंद्रात मोठं पद मिळावं याबाबत. मात्र त्या वक्तव्याचा विपर्यास होतो आहे. आता यावर मी न बोललेलचं बरं. मनसेबद्दल बोलताना शिरसाट म्हणाले की, लोकसभेची निवडणुक ही राष्ट्रीय पातळीवरील मुदद्यांवर लढवली जाते. गावात पाणी नाही आलं या मुद्द्यावर लढवली जात नाही. सर्वांना माहित आहे मोदींच्या नेतृत्वात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, छोट्या पक्षांचा थोडा परिणाम होईल. पण देशात मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या