Wednesday, June 26, 2024
Homeनगरसंत ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाने पक्षपातीपणा केल्याचा आरोप

संत ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाने पक्षपातीपणा केल्याचा आरोप

बैठकीत नाराजी

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाने पक्षपातीपणा करून एकादशी च्या दिवशी होणार्‍या सेवेकरी पदभार कार्यक्रमाचे पत्रिकेत ठराविक पक्षाला प्राधान्य दिल्याचा आरोप नेवासा येथे ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आला असून याबाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. शहरातील दुर्गादेवी मंदिरात ग्रामस्थ व श्री संत ज्ञानेश्वर मंदिर पावित्र्य बचाव कृती समितीची बैठक अ‍ॅड. के. एच. वाखुरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत चर्चेअंती विविध ठराव करण्यात आले. 18 जून रोजी नवीन सेवेकरी नियुक्ती कार्यक्रम पत्रिकेत ठराविक पक्षाच्या व्यक्तींचीच नावे टाकण्यात आली. देवस्थान विश्वस्त मंडळाने पक्षपतीपणा करीत कार्यक्रम आयोजित केला असून संत महंतांच्या उपस्थितीबाबत कोणताही आक्षेप नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संत ज्ञानेश्वर मंदिर विकास विकास आराखडा तयार करून 200 कोटीचा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विकासासाठी एक रुपयाही निधी कमी पडू दिली जाणार नाही असे आश्वसन दिले. असे असताना विश्वस्त मंडळाने त्यांचे साधे आभारही मानले नाहीत. या पक्षपाती वृत्तीमुळे देवस्थानचा विकास रखडला आहे. विश्वस्त मंडळ करत असलेल्या राजकारणाचा निषेध नोंदवित आहोत. हे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात यावे.

कार्यक्रमाला गालबोट लावण्याची इच्छा नसल्याने फक्त निषेध नोंदवत असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. संतोष पंडुरे यांनी सूचना मांडली.त्यास अशोक ताके यांनी अनुमोदन दिले. बैठकीस भाऊसाहेब वाघ, राजेश कडू, संजय गवळी, मनोज पारखे, बंडू शिंदे, शोभाताई आलवणे, सुनील वाघ, रोहीत पवार, बाबा कांगुणे, आदिनाथ पटारे, निखिल जोशी, संजय पवार, बापूसाहेब दारकुंडे आदी हजर होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या