बीड । Beed
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज बीड जिल्ह्यातील केज न्यायालयात आज पहिली सुनावणी होणार झाली. या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले होते. सुनावणीदरम्यान धनंजय देशमुख उपस्थित होते. पुढील सुनीवणी 26 मार्चला होणार आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. 9 डिसेंबर 2024 ला संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. मागील तीन महिन्यांपासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात गाजत असून याची अद्याप चौकशी सुरु आहे. यात एसआयटी देखील नियुक्त करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र या प्रकरणाचा पूर्ण तपास करण्यासाठी आता सदर प्रकरण न्यायालयात गेले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने देशमुख हत्या प्रकरणातील खटला हा बीडच्या न्यायालयात चालवण्याची विनंती एसआयटीकडून करण्यात आलेली आहे. मात्र पहिली सुनावणी ही केज न्यायालयातच होणार असल्याचे निश्चित झाले होते.
केज न्यायालयात काय काय झाले?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी केज न्यायालयात झाली. या सुनावणीत धनंजय देशमुख उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आरोपी व्हीसीद्वारे कोर्टात उपस्थित होते. यावेळी बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांच्या सीडीआरची मागणी करण्यात आली. तसेच आरोपीचे जबाब मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकिल राहुल मुंडे यांनी केला. यानंतर वाल्मिक कराडचे वकिल विकास खाडे यांनी आपली बाजू मांडली. सरकारी वकिल बाळासाहेब कोल्हे यांनीदेखील युक्तिवाद केला. 26 मार्चला सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडेल असा युक्तिवाद कोल्हेंकडून करण्यात आला. यानंतर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे.
देशमुख हत्येप्रकरणी कोर्टात काय घडलं?
सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आरोपी व्हीसीद्वारे उपस्थित होते
बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांच्या सीडीआरची मागणी
आरोपीचे जबाब मिळाले नसल्याचा आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद
दोषारोपत्रातील कागदपत्रांची कराडच्या वकिलांकडून मागणी
फिर्यादी शिवराज देशमुखांची कोर्टात हजेरी
संतोष देशमुखांच्या अपहरणावेळी शिवराज देशमुख त्यांच्यासोबत होते
सुनावणीवेळी धनंजय देशमुखही कोर्टात उपस्थित
सरकारी पक्ष 26 मार्चला कोर्टात बाजू मांडणार