Thursday, April 10, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSantosh Deshmukh Murder Case : "भावाला सोडण्याची २० हून अधिकवेळा विनंती केली,...

Santosh Deshmukh Murder Case : “भावाला सोडण्याची २० हून अधिकवेळा विनंती केली, मात्र आरोपींनी…”; धनंजय देशमुखांनी जबाबात सांगितला घटनाक्रम

मुंबई | Mumbai

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता जवळपास १०० दिवस होऊन गेले आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. अशातच आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार धनंजय देशमुख यांनी आपल्या जबाबात म्हटले की, “बंधू संतोष देशमुख यांचे अपहरण (Kidnapping) झाल्यानंतर आपण आरोपी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडला अनेकदा फोन केले होते. यावेळी फोनवरून आपल्या भावाला सोडण्याची २० हून अधिकवेळा विनंती केली होती. मात्र, विनवणी करूनही आरोपींनी ऐकले नाही. तसेच आरोपी विष्णू चाटे याने वारंवार सांगितले की, दहा मिनिटात सोडतो, वीस मिनिटात सोडतो, अर्ध्या तासात सोडतो. पण त्यांनी संतोष देशमुख यांना सोडले नाही. यानंतर त्यांची क्रूरपणे हत्या केली”, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच “०९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण झाले त्याच दिवशी खंडणीच्या (Extortion) आड येऊ नको असे म्हणत विष्णू चाटे याने संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती”, असे धनंजय देशमुख यांनी जबाबात म्हटले आहे. तर धमकीनंतरही केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवली होती. मात्र, त्यानंतर परिस्थिती आणखी बिघडत गेली. शेवटी भावाची निर्घृण हत्या करण्यात आली”, असेही धनंजय देशमुख आपल्या जबाबात म्हणाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, विष्णू चाटे यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. तसेच आरोपींपैकी ६ जण बीड जिल्हा कारागृहात तर विष्णू चाटे हा आरोपी सध्या लातूरच्या कारागृहात आहे. या हत्येप्रकरणी आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सकाळी ११ वाजता तिसरी सुनावणी होणार आहे. यावेळी आरोपींवर चार्ज फ्रेम करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहून न्यायालयाकडे विनंती अर्ज दाखल करणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १० एप्रिल २०२५ – माणसाचा होतोय कानूस

0
विकासाच्या उद्देशाने म्हणा किंवा त्याच्या नावाखाली म्हणा निसर्गावर होत असलेले मानवी अतिक्रमण चर्चेत आहे. मुंबईच्या आरे जंगलातील बांधकामे आणि त्यासाठी केला जाणारा जंगलाचा र्‍हास...