Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSantosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडचा पाय खोलात; संपत्ती जप्त होण्याची...

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडचा पाय खोलात; संपत्ती जप्त होण्याची शक्यता

डिलिट केलेला मोबाईल डेटाही रिकव्हर

मुंबई | Mumbai

बीडमधील (Beed) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून (Maharashtra) संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड (Walmik Karad) याचे नाव समोर आले आहे. सीआयडीने न्यायालयात (CID Court) दाखल केलेल्या आरोपपत्रात संतोष देशमुख हत्या प्रकरण उलगडून सांगताना पुरावेदेखील नमूद केले आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड याच्याकडे असलेला प्रचंड पैसा आणि त्याच्या श्रीमंतीचा तपशील समोर आला आहे.

- Advertisement -

आरोपपत्रातील या नव्या माहितीनुसार, पोलिसांनी (Police) वाल्मिक कराड याची सगळ्या मालमत्तेचा तपशील खणून काढला आहे. वाल्मिक कराड याच्याकडे तीन आयफोन (I Phone) होते. संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वाल्मिक कराड याने या तिन्ही आयफोनमधील डेटा डिलिट केला होता. मात्र, एसआयटी (SIT) पथकाने तंत्रज्ञांची मदत घेऊन हा डेटा रिकव्हर केला. त्यानंतर आता वाल्मीक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी एसआयटी टीमकडून मोठ्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वाल्मिक कराडकडे तीन आयफोन?

वाल्मिक कराड गोल्डन रंगाचा आयफोन १६ प्रो वापरत होता. तसेच त्याच्याकडे एक गोल्डन रंगाचा आयफोन प्रो १३ देखील होता. तिसरा आयफोन १३ प्रो फिक्कट निळ्या रंगाचा होता. वाल्मिकचा गोल्डन रंगाचा आयफोन १६ प्रो या फोनची किंमत साधारण तीन लाखापर्यंत आहे. तर इतर फोन दीड ते दोन लाख रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.

वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या

फोर्ड इंडेव्हर MH-44/T-0700
अशोक लेलँड लि.(हायवा) MH-44/U-0700
जॅग्वार लैंड रोवर इंडिया MH-44/AC-0700
जेसीबी इंडिया लिमिटेड MH-44/S-7450
मर्सीडीझ बेन्झ इंडिया प्रा.ले. MH-44/Z-0007
बीएमडब्लु इंडिया प्रा. लि. MH-44/AC-1717
अशोक लंयलँड लि.(हायवा) MH-44/U-1600

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...