Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमCrime News : सराफ व्यापार्‍यांचे दागिने घेऊन पळालेली टोळी पकडली

Crime News : सराफ व्यापार्‍यांचे दागिने घेऊन पळालेली टोळी पकडली

एलसीबीने पश्चिम बंगालमधून घेतले ताब्यात || 51 लाखाचे दागिने हस्तगत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील सराफ व्यापार्‍याचा विश्वासघात करून तब्बल दोन किलोपेक्षा अधिक (2021 ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि चोख सोने (अत्यंत शुध्द आणि अस्सल सोने) घेऊन पसार झालेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यातील हावरा जिल्ह्यातून चौघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 51 लाख 13 हजार 795 रूपयांचे 572 ग्रॅम दागिने हस्तगत करण्यात आले आहे.

- Advertisement -

सोमेन शांती बेरा उर्फ कार्तीक (वय 33), दिपनकर आरूण माजी (वय 22), अनिमेश मनोरंजन दोलुई (वय 25) व सोमनाथ जगन्नाथ सामंता (वय 30) अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. कृष्णा जगदीश देडगावकर (वय 32, रा. गायकवाड कॉलनी, सावेडी रस्ता, अहिल्यानगर) यांनी 27 ऑक्टोबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ते सोनार व्यवसाय करतात. त्यांच्यासह आठ सोनारांकडील सुमारे 2021 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन दिपनकर माजी, सोमीन बेरा, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तु बेग आणि स्नेहा बेरा 26 ऑक्टोबर रोजी पसार झाले होते. देडगावकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

YouTube video player

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक गठीत करण्यात आले. या पथकामध्ये उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, दीपक घाटकर, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर आणि प्रशांत राठोड यांचा समावेश होता. माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना संशयित आरोपी अमरागरी, (जि. हावरा, प. बंगाल) येथे असल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर पथकाने तात्काळ पश्चिम बंगालला रवाना होत अमरागरी येथे छापा टाकला व चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली असून त्यांचे इतर दोन साथीदार संतु बेरा आणि स्नेहा बेरा यांचा शोध सुरू आहे. ताब्यातील संशयित आरोपींकडून पोलिसांनी 51 लाख 13 हजार 795 रूपये किंमतीचे 572.75 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. हे सर्व दागिने कोतवाली पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून पुढील तपास कोतवाली पोलीस ठाणे करीत आहे.

ताज्या बातम्या

राहुल

Loksabha Session: राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभेत मोठा राडा; सभापतींवर कागदपत्रे फेकली,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiमंगळवारी संसदेच्या कामकाजादरम्यान, सभागृहाच्या शिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचे प्रकरण समोर आले. लोकसभेत झालेल्या गोंधळादरम्यान, काही खासदारांनी सभापतींवर कागदपत्रे फेकली. यावर...