Monday, February 2, 2026
Homeक्राईमShrirampur : भाव वाढल्याने सराफा दुकानांकडे चोरट्यांचा मोर्चा

Shrirampur : भाव वाढल्याने सराफा दुकानांकडे चोरट्यांचा मोर्चा

श्रीरामपूर शहरात 1 किलो चांदीसह सोने लांबविले || दोन ठिकाणी अयशस्वी प्रयत्न

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सोने-चांदीच्या भावात विक्रमी वाढ होत असल्याने चोरट्यांनी आता सराफा दुकानांकडे आपला मोर्चा वळविला आहे. याचा फटका श्रीरामपुरातील सराफांना बसला. दोन सराफा दुकाने फोडण्यात अपयश आल्यानंतर या चोरट्यांनी तिसरे सराफा दुकान फोडून दुकानातील सुमारे 1 किलो चांदीसह सोन्याचे मौल्यवान दागिने लांबविले. या प्रकाराने सराफा व्यापार्‍यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरट्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

चोरट्यांनी शहरातील तीन सराफ दुकानांना लक्ष्य करत चोरीचा प्रयत्न केला, यातील तालुक्यातील वडाळा महादेव येथील महेश किशोर महाले यांच्या महाले ज्वेलर्स हे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 95 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीची दागिणे चोरुन नेली. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास तिघा अज्ञात चोरट्यांनी शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ गाठली. नेहमी गजबजलेली ही बाजारपेठ रात्रीच्या वेळी ओस असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी आपली योजना अंमलात आणली. सुरुवातीला त्यांनी दोन सराफ दुकानांचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला.

YouTube video player

मात्र सुरक्षिततेच्या उपाययोजनांमुळे आणि मजबूत कुलूप असल्याने त्यांना त्या ठिकाणी यश आले नाही. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा सराफ व्यावसायिक महेश महाले यांच्या सोन्याच्या दुकानाकडे वळवला. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील सुमारे 1 किलो चांदीसह सोन्याचे मौल्यवान दागिने असा 95 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. ही संपूर्ण चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात स्पष्टपणे कैद झाली आहे. फुटेजमध्ये तिघे चोरटे दिसून येत असून, त्यांची हालचाल, चोरी करण्याची पद्धत आणि घटनास्थळावर घालवलेला वेळ स्पष्टपणे दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस चोरट्यांचा माग काढत असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बीएनएस 305 अ, 331(4), 62 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या मुख्य आणि वर्दळीच्या बाजारपेठेत अशा प्रकारे धाडसी चोरीची घटना घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्यवर्ती बाजारपेठेत पोलीस गस्त वाढवावी, तसेच रात्रीच्या वेळी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी, अशी मागणी व्यापार्‍यांकडून करण्यात येत आहे. अनेक व्यापार्‍यांनी पोलिसांकडे आपली नाराजी व्यक्त करत सुरक्षेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली आहे. या घटनेनंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आगामी 3 दिवस संगमनेर, कोपरगाव, अकोले व राहात्यात ढगाळ...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड, सटाणा, कळवण, देवळा, मालेगाव, धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर आदी...