Friday, May 3, 2024
Homeनाशिकवनजमीनीवर अतिक्रमण भोवले; निफाड तालुक्यातील सरपंचासह सदस्य अपात्र

वनजमीनीवर अतिक्रमण भोवले; निफाड तालुक्यातील सरपंचासह सदस्य अपात्र

निफाड | प्रतिनिधी Niphad

अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे (Additional Collector Dattaprasad Nade) यांनी दिलेला निकाल रद्द करून बोकडदरे (ता.निफाड) येथील थेट सरपंच आशा भाऊराव दराडे यांनी वनजमिनीत अतिक्रमण करून शेततळे खोदले. सदस्य स्वाती शंकर बोडके यांनी गायरान जमीनीत वास्तव्य केल्याचे सिद्द झाल्याने नाशिकचे अपर आयुक्त भानुदास पालवे (nashik additional commissioner bhanudas palave) यांनी त्यांना उर्वरीत कालावधीसाठी अपात्र घोषित केले आहे. निफाड तालुक्यात थेट सरपंचावर अशा प्रकारची कार्यवाही झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे….

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोकडदरे ग्रामपंचायतीची ७ ऑक्टोबर २०१७ रोजी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यात आशा भाऊराव दराडे या थेट सरपंच व स्वाती शंकर बोडके या प्रभाग २ मधून निवडून आल्या होत्या.

मात्र, त्यांनी वनजमीनीवर अतिक्रमण केले असल्याने त्यांचे पद रद्द करण्यात यावे यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत रामकृष्ण सांगळे यांनी अपर जिल्हाधिकारी यांचेकडे दावा दाखल केला होता.

तेथे वस्तुनिष्ठ पुरावे देण्यात सांगळे कमी पडल्याने अपील फेटाळले होते. चंद्रकांत सांगळे यांनी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे (Adttional collector Dattaprasad nade) यांच्या दि.२१ नोव्हे २०२१ रोजी दिलेल्या निकालास आव्हान देत दि.१७ नोव्हे २०२१ रोजी महाराष्ट्र ग्रा.प.अधिनियम १९५८ चे कलम १६ अन्वये सरपंच आशा भाऊराव दराडे व सदस्य स्वाती शंकर बोडके, ग्रामसेवक, निवडणूक निर्णय अधिकारी आर.बी.तायडे यांचे विरोधात नाशिकचे अपर आयुक्त यांचेकडे अपील केले होते.

अपिलार्थीने सरपंच दराडे यांनी वनविभागाच्या गट नं.१६८ मध्ये शेततळे बांधून अतिक्रमण केले असल्याचे तर सदस्य स्वाती शंकर बोडके या आनंदा देवराम सानप यांचे घरात पोटकराराने राहत असले बाबत कोणताही सबळ पुरावा समोर आला नाही.

त्यामुळे ते गट नं.१६६ मधील बेघर वस्ती मिळकत क्र.९५ गायरान क्षेत्रात रहिवास करीत असल्याची बाब अपर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यामुळे सरपंच व सदस्य यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असल्याची बाब स्पष्ट झाली. ग्रा.प.सरपंच व सदस्यपदी महाराष्ट्र ग्रा.प.अधिनियम १९५८ चे कलम १४(१),(ज-३) अपील तरतूद तसेच सर्वोच्च न्यायालय यांनी सिव्हिल अपील नं.६८३२/२०१८ जनाबाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार यामध्ये १९ ऑगस्ट २०१८ रोजी दिलेला निर्णय व त्यामधील निरीक्षणे प्रस्तुत दाव्याला लागू होत असल्याने अपर जिल्हाधिकारी नाशिक यांनी ३ नोव्हे.२०२१ रोजी पारित केलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज आहे.

या निर्णयाप्रत अपर आयुक्त आल्याने त्यांनी दि.२९ मार्च २०२२ रोजी आदेश काढत सरपंच आशा दराडे व सदस्य स्वाती बोडके यांना उर्वरित कालावधी साठी अनर्ह घोषित केले आहे. थेट सरपंचावरच अशा पद्धतीने कार्यवाही झाल्याने निफाड तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अपिलार्थी चंद्रकांत सांगळे यांचे बाजूने ॲड एस.डी घोटेकर व ॲड.संजय गाडे यांनी बाजू मांडली तर ॲड सतीश भगत यांनी सरपंच व इतरांची बाजू मांडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या