Thursday, September 19, 2024
Homeक्राईमसरपंचावर कोयत्याने केला खुनी हल्ला

सरपंचावर कोयत्याने केला खुनी हल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

गावातील रस्त्याचे मुरूमीकरण सुरू असताना माझ्या घरासमोर मुरूम (Murum) का टाकला असे म्हणत सरपंचावर कोयत्याने हल्ला (Sarpanch Coyote Attack) करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील घोसपुरी गावात (Ghospuri) शनिवारी (20 जुलै) दुपारी घडली. या घटनेतील हल्लेखोर अय्याज शौकत शेख (रा. घोसपुरी) याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट, अ‍ॅट्रॉसिटीसह अन्य कलमानुसार गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी घोसपुरीचे सरपंच किरण शेवा साळवे (वय 37) यांनी रात्री उशिरा फिर्याद दिली आहे. सध्या पावसाळा असल्याने घोसपुरी (Ghospuri) गावात रस्त्यात चिखल होऊ नये म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास सरपंच किरण साळवे, उपसरपंच विठ्ठल हंडोरे व ग्रामपंचायत सदस्य आणि इतर काही जण हे काम कसे चालले आहे याची पाहणी करत होते. त्यावेळी अय्याज शेख तेथे दुचाकीवर आला.त्याने सरपंच साळवे यांना जातीवाचक शिवीगाळ करत तुला सांगितले ना माझ्या घरासमोर मुरूम टाकू नको, तु जातीच्या जीवावर लय माजला काय, थांब तुझा माज जिरवतो, असे म्हणत पळत घरात गेला व घरातून धारदार कोयता आणून सरपंच साळवे यांच्यावर वार केला.

मात्र त्यावेळी सरपंच (Sarpanch) साळवे मागे सरकल्याने ते थोडक्यात बचावले. त्यानंतर त्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या आईने त्याच्या अंगावर उडी मारली व त्याचा वार हुकवला. त्यानंतर त्याने सरपंच साळवे तसेच उपसरपंच विठ्ठल हंडोरे यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत सरपंच साळवे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी (Police) घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना घटनेची माहिती दिली. तसेच घटनेच्या वेळीचे छायाचित्रण पाठवले. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या सूचना व मार्गदर्शनानंतर संशयित आरोपी अय्याज शौकत शेख याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्टसह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नगर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या