Saturday, September 21, 2024
Homeनगरकडाक्याची थंडी...आसपास कोणीही नाही अन् तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या...मग...

कडाक्याची थंडी…आसपास कोणीही नाही अन् तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या…मग…

पारनेर (तालुका प्रतिनिधी)

- Advertisement -

वेळ रात्री 12 ची, कडाक्याची थंडी अशातच सुपा बस स्थानक चौकातील वाळवणे रोडवरील उघड्यावरील जागेत एकट्या गर्भवती महिलेला कळा चालू झाल्या.

एका अनोळखी व्यक्तीने ही माहिती देताच सुपा गावच्या सरपंच मनिषा रोकडे व त्यांचे पती योगेश रोकडे यांनी क्षणाचाही वेळ न घालवता धाव घेत तीला मदत केली. तसेच महिलेस रूग्णालयात दाखल करत संपुर्ण उपचार करून दिले. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

PHOTO : कोल्हापूरची महालक्ष्मी ते वणीची सप्तशृंगी देवी… प्रजासत्ताकदिनी ‘असा’ असणार महाराष्ट्राचा चित्ररथ

शुक्रवार (दि.20) रात्री 12.15 वाजेच्या दरम्यान सरपंच मनिषा रोकडे यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला व त्यांनी काही माहिती देऊन सुपा चौकात भर गारठ्यात एका महिलेस प्रस्तुती वेदना सुरू असल्याची माहिती दिली. सरपंच दामपत्य तातडीने सुपा बस स्थानकावर पोहोचले. तेव्हा तेथे एक गर्भवती महिलेला प्रस्तुतीच्या कळा घेत होती.

सरपंच मनिषा रोकडे यांनी जातीन महिलेला साडी तसेच कपडे, स्वेटर बरोबर घेतलेले होते. तीला गाडी बसवेपर्यंत महिलेला अधिक वेदना होऊ लागल्या. ती प्रस्तुत होईल असी परिस्थिती निर्माण झाल्याने सरपंचांनी काही महिलांची मदत घेऊन तीची तेथेच प्रसुती केली. काही क्षणात महिलेने तेथेच एका गोंडस बाळाला जन्म दिला.

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

सरपंच दामपत्याने ताबडतोब त्या महिलेला व बाळाला सुप्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. बाळावर व महिलेवर पुढील उपचार चालू केले. तोपर्यत सुपा गावचे उपसरपंच दत्तात्र्य पवार व अमोल पवार घटना स्थळी पोहचुन आवश्यक ती मदत कपडे औषधे उपलब्ध करून दिले. बाळ बाळंतीन सुखरूप झाल्यावर दुसर्‍या दिवशी त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पोहच केले. यासाठीचा सर्व खर्च त्यांनी केला.

या धकाधकीच्या जीवनात आपले सख्खे साथ देत नसताना सुपा गावच्या सरपंच मनिषा रोकडे, त्यांचे पती योगेश रोकडे, उपसरपंच दत्तात्र्य पवार व अमोल पवार यांनी या महिलेस सर्वोतपरीने कदत केली. त्यांच्या या मदतीची माहिती गावात कळताच सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शेतात पाणी द्यायला गेले अन् समोर दिसले बिबट्याचे बछडे; पुढे असं घडलं की…

अनोळखी कॉल आल्यानंतर ती महिला या गावची अथवा दुसरी कोणी याचा विचार न करता ती एक महिला अन प्रसुती वेदना होत असलेली अवघडेली महिला आहे याची जाणीव झाली. भर थंडीत अन उघड्यावर तीला त्रास होत असल्याने कर्तव्य म्हणुन धाव घेऊन मदत केली.

– मनिषा रोकडे, सरपंच सुपा

- Advertisment -

ताज्या बातम्या